नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अशात इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना काहीसा दिलासा देण्यात आला आहे. कंपन्यांनी सर्व मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवरील वॉरंटी 60 दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानंतर सॅमसंग कंपनीने आपल्या उत्पादनांवरील 30 एप्रिल रोजी संपणारी वॉरंटी 31 मे 2020 पर्यंत वाढवली आहे. तर वनप्लसकडून 1 मार्च ते 30 मेपर्यंत संपणारी वॉरंटी वाढवून ती 31 मे करण्यात आली आहे. oppoनेही वॉरंटी वाढवली आहे. ओप्पोने त्यांच्या ग्राहकांसाठी ऑनलाईन फोन रिपेयरिंग सेवा सुरु केली आहे. याद्वारे, ग्राहक सामान्य सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअरशी संबंधित समस्यांचं निराकरण करु शकतात.
वॉरंटी वाढवण्याच्या निर्णयावर शाओमीचे प्रवक्ता यांनी सांगितलं की, टीव्ही, फिचरफोन आणि ऍक्सेसरीज कंपनी डेटलने आपल्या उत्पादनांवरील वॉरंटी 60 दिवसांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. यात 20 मार्च ते 20 मे दरम्यान वॉरंटी संपणाऱ्या उत्पादनांचा समावेश असणार आहे.
डेटलचे संस्थापक योगेश भाटिया यांनी सांगितलं की, लॉकडाऊनमुळे आम्ही ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वॉरंटी 60 दिवसांपर्यंत वाढवली असल्याचं सांगितलं.
दरम्यान, रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांना कोरोनाचं सावट असताना मोठा दिलासा दिला आहे. JioPhone यूजर्सला १७ एप्रिलपर्यंत १०० मिनिटं वॉईस कॉलिंग आणि १०० एसएमएस फ्री देण्याची घोषणा केली आहे. सोबतच जिओफोन यूजर्सची वॅलिडिटी संपली तरी देखील इनकमिंग कॉल्स सुरु राहणार आहेत. याआधी एअरटेल, वोडाफोन-आइडिया आणि बीएसएनएलने देखील प्रीपेड ग्राहकांना अकाउंट वॅलिडिटी आणखी वाढवण्याची घोषणा केली आहे.