आधार कार्डसोबत लिंक करा सिम कार्ड अन्यथा बंद होईल फोन नंबर

तुमच्याकडे मोबाईल आहे तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 10, 2017, 04:59 PM IST
आधार कार्डसोबत लिंक करा सिम कार्ड अन्यथा बंद होईल फोन नंबर  title=
File Photo

नवी दिल्ली : तुमच्याकडे मोबाईल आहे तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

केंद्र सरकारने आपल्या जवळपास सर्वच योजनांमध्ये आधार कार्ड आवश्यक केलं आहे. त्याच आधारावर आता मोबाईल सिम कार्डही आधार कार्डसोबत लिंक करणं गरजेचं आहे. केंद्र सरकारने हे काम करण्यासाठी एक डेडलाईनही निश्चित केली आहे.

जर तुम्ही तुमचं मोबाईल सिम कार्ड हे आधार कार्डसोबत लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर करुन घ्या. नाहीतर, तुमचा मोबाईल नंबर बंद होईल.

फेब्रुवारी २०१८ पर्यंत सिम कार्ड आधार कार्डासोबत लिंक केलं नाही तर तुमचं सिम कार्ड बंद करण्यात येणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पडताळणीसाठी आधार कार्डशी सिम लिंक करण्याचे आदेश दिले होते.

सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांच्या वेरिफिकेशनसाठी काय पद्धत आहे. बनावट ओळखपत्रावर घेतलेले क्रमांक दहशतवादी किंवा इतर गुन्ह्यांसाठी वापरण्यात येतात. त्यामुळे कुठलंही सिम कार्ड वेरिफिकेशनशिवाय देऊ नका अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात एका एनजीओकडून करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला होता.