'मोबाईलच्या अतिवापराविरोधात युवकांवर मर्यादा घालणारा कायदा बनवा '

 अश्लिल संगित, चित्रपट आणि उत्तेजना भडकवणाऱ्या जाहिरातींवरही बंदी घालायला हवी अशी मागणी त्यांनी केली.

Updated: Apr 29, 2018, 04:29 PM IST
'मोबाईलच्या अतिवापराविरोधात युवकांवर मर्यादा घालणारा कायदा बनवा ' title=

बलिया :  देशातील बलात्काराच्या वाढत्या घटना पाहता केंद्र सरकारने २० वर्षाखालील तरूणांच्या अतिमोबाईल वापरावर मर्यादा घालाव्यात. त्यासाठी योग्य तो कायदा बनवावा अशी मागणी एसपीचे राष्ट्रीय सरचिटणीस रमाशंकर विद्यार्थी यांनी केली आहे. बलात्काराच्या घटना या अत्यंत त्रासदायक असल्याची प्रतिक्रियाही विद्यार्थी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

विद्यार्थी यांनी पुढे बोलताना सांगतिले की, २० वर्षांखालीली विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या मोबाईलच्या अतिवापराला मर्यादा घालाव्यात. इतकेच नव्हे तर, अश्लिल संगित, चित्रपट आणि उत्तेजना भडकवणाऱ्या जाहिरातींवरही बंदी घालायला हवी अशी मागणी त्यांनी केली.

सध्यास्थितीत काही मदरसे आणि मंदिरांमध्ये बलात्कार झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ते पाहता मंदिर, मशिदी, चर्च आणि गुरूद्वारांमध्ये महिला सुरक्षा कर्मचारी तैनात करणे गरजेचे आहे. सोबतच पाळणाघरांमध्येही सीसीटीव्ही बसविण्यात यायला हवेत.