फेक न्यूजवर मोदी सरकारचा डिजिटल स्ट्राइक, पाकिस्तानीसह 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक

8 YouTube Channels Block : मोदी सरकारने पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राइक केला आहे. भारत सरकारने 8 YouTube चॅनेल  Block केली आहेत.  

Updated: Aug 18, 2022, 12:39 PM IST
फेक न्यूजवर मोदी सरकारचा डिजिटल स्ट्राइक, पाकिस्तानीसह 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक title=

नवी दिल्ली : 8 YouTube Channels Block : मोदी सरकारने पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राइक केला आहे. भारत सरकारने 8 YouTube चॅनेल  Block केली आहेत. यात पाकिस्तानी चॅनेलचाही समावेश आहे. भारताविरोधात बनावट आणि चुकीचे वृत्त (Fake News) पसरविणाऱ्या YouTube Channels जोरदार दणका देताना ती बंद करण्यात आली आहेत. ही YouTube Channels ब्लॉक करण्यात आली आहेत.

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीची माहिती पसरवल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आठ YouTube चॅनेल ब्लॉक केली आहेत. यात 7 भारतीय चॅनेल आणि एक पाकिस्तानी वाहिनी यांचा समावेश आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले की, 'भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीचे वृत्त आणि बनावट (Fake News) माहिती प्रसार करण्यासाठी या 8 YouTube चॅनेलचा वापर केला गेला आहे. त्यामुळे ही चॅनेल्स ब्लॉक केली आहेत. IT नियम, 2021 अंतर्गत 7 भारतीय आणि 1 पाकिस्तान आधारित YouTube न्यूज चॅनेल ब्लॉक केले आहेत. 

भारताला बदनाम करणाऱ्या YouTube चॅनेल  114 कोटी लोकांनी पाहिली आहेत. तर 85 लाख 73 हजार सब्सक्राइबर्स आहेत. यूट्यूबवर ब्लॉक केलेल्या चॅनेलद्वारे भारताविरोधात खोटी आणि बनावट तसेच चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात येत होते.