व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरचाच कल्ला, असा बनवा तुमच्या फोटोचा स्टिकर

मला पण असे स्टिकर्स करुन देणार का ? असं तुम्ही देखील विचारलात का ?

Updated: Nov 9, 2018, 04:17 PM IST
व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरचाच कल्ला, असा बनवा तुमच्या फोटोचा स्टिकर title=

मुंबई : आतापर्यंतच्या दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मेसेज आणि इमेजच्या माध्यमातून आल्या होत्या. यावर्षी अनेकांनी फोटो आणि शुभेच्छा पाठवल्या. हे कसं करतात ? मला पण असे स्टिकर्स करुन देणार का ? असं तुम्ही देखील विचारलात का ? मग काळजी करू नका...आपण आज याबद्दल जाणून घेऊया..

मग तुम्ही देखील तुमच्या मित्रपरिवाराला फोटो स्टिकर्स पाठवून शुभेच्छा देऊ शकाल. हे फिचर वापरण्यासाठी तुमच्याकडे व्हॉट्सअॅपचे 2.18.327 वर्जन असणं गरजेच आहे. तुमच्याकडे अजूनही जुनं वर्जन असेल तर ते अपडेट करून घ्या.. 

आपल्या आवडीचा फोटो सिलेक्ट करा आणि त्याला पीएनजी फॉर्मेटमध्ये कन्वर्ट करा. 

एक लक्षात असू द्या..ज्या फोटोचा तुम्हाला स्टिकर बनवायचाय त्याला कोणताही बॅकग्राऊंड नसावा. 

बॅकग्राऊंड हटविण्यासाठी बॅकग्राऊंड इरेजर टूल इंस्टॉल करुन त्याचा वापर करा. 

स्वत:चा स्टिकर बनविण्यासाठी Sticker maker for WhatsApp अॅप डाऊनलोड करा. 

अॅप डाऊनलोड केल्यानंतर ‘Create a new sticker pack’ वर क्लिक करा. 

तुम्हाला तुमचं नाव आणि ऑथर सबमिट कराव लागेल. यानंतर तुम्हाला मीडिया अॅड करायला सांगितला जाईल. स्टिकर बनविण्यासाठी add sticker वर क्लिक करा. 

स्टिकरसाठी फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तो क्रॉप देखील करु शकता. काही चुकल्यास तुम्ही पुन्हा रिसेट करुन क्रॉप करु शकता. 

अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त 30 स्टिकर्स अॅड करु शकता. त्यानंतर हे स्टिकर्स आपल्या यूजर अॅपमध्ये दिसू शकतात.

व्हायरसची शक्यता

व्हॉट्सअॅपवर स्टिकर सेवा सुरू करायची असेल तर विशिष्ट लिंक २० जणांना पाठवा, अशा आशयाचे बोगस मेसेज देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत. मात्र त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका... कारण असा मेसेज हा एखादा व्हायरस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

एवढेच नव्हे तर स्वतःचा फोटो असलेले स्टिकर्सही तुम्हाला तयार करता येतील किंवा तुम्हाला एखादा पर्सनलाइज संदेश आणि फोटोही स्टिकर म्हणून बनवता येईल.

अॅन्ड्रॉईड युझर्ससाठी...

अँड्रॉईड फोन वापरणारी मंडळी PERSONAL STICKER FOR WHATSAPP आणि BACKGROUND ERASER अशी स्वतंत्र अॅप्लिकेशन्स वापरून पर्सनलाइज स्टिकर तयार करू शकतात... त्याबाबतच्या स्वतंत्र लिंक्स युट्युबवर उपलब्ध आहेत.