'जिओ'नं उघडला ऑफरचा खजिना...

भारतात फोर जी नेटवर्क क्रांतीमध्ये रिलायन्स जिओनं महत्त्वाची भूमिका निभावलीय, असं निरीक्षण नुकतंच लंडनच्या 'ओपन सिग्नल' या कंपनीनं एक सर्व्हे जाहीर करत नोंदवलं. रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नव-नवे ऑपर घेऊन येताना दिसतंय. आता पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी जिओनं खजाना पुन्हा एकदा उघडलाय. 

Shubhangi Palve Updated: Apr 10, 2018, 07:32 PM IST
'जिओ'नं उघडला ऑफरचा खजिना...  title=

मुंबई : भारतात फोर जी नेटवर्क क्रांतीमध्ये रिलायन्स जिओनं महत्त्वाची भूमिका निभावलीय, असं निरीक्षण नुकतंच लंडनच्या 'ओपन सिग्नल' या कंपनीनं एक सर्व्हे जाहीर करत नोंदवलं. रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नव-नवे ऑपर घेऊन येताना दिसतंय. आता पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी जिओनं खजाना पुन्हा एकदा उघडलाय. 

२४८ रुपयांत २५०० चं गिफ्ट 

नव्या ऑफरनुसार, ग्राहकांना ९९९ रुपयांतक एक फ्री जिओ फाय डिव्हाईस आणि १५०० रुपयांच्या किंमतीत १०० जीबी अतिरिक्त फोर जी डेटा मिळेल. यासाठी ग्राहकांना कमीत कमी १४९ रुपयांचा पहिला रिचार्ज करणं गरजेचं असेल. सोबतच ९९ रुपयांत जिओची प्राईम मेम्बरशीप घ्यावी लागेल. 

प्रीपेड ग्राहकांना फायदा

ही ऑफर गूगल होम किंवा क्रोमकास्ट डिव्हाईस (फक्त भारतीय) च्या खरेदीवर उपलब्ध असेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना रिलायन्स डिजिटल, रिलायन्स डीएक्स मिनी, जिओ स्टोअर डिवाईस खरेदी करता येईल. जिओ प्रीपेड ग्राहकही या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. 

कधीपासून ऑफर होणार सुरू?

माय जिओ अॅप मध्ये १० जीबीचे १० वाऊचर म्हणजेच १०० जीबी ग्राहकांना मिळतील. हे एका वर्षांच्या आत ग्राहकांना रिडिम करता येतील. सोबतच जिओ सिम अॅक्टिव्हेशनची तारीख १ एप्रिल २०१८ पेक्षा अगोदरची नसावी. ऑफर १० एप्रिल २०१८ पासून सुरू झालीय.