Jio ची शानदार ऑफर, पैसे न देता 5 वेळा रिचार्ज करु शकता! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

असे ग्राहक आता त्यांचा दैनंदिन डेटा संपल्यानंतर या रीचार्जचा वापर करु शकतील.

Updated: Jul 4, 2021, 08:45 PM IST
Jio ची शानदार ऑफर, पैसे न देता 5 वेळा रिचार्ज करु शकता! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया title=

मुंबई : रिलायन्स जिओने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी एक उत्तम योजना सुरू केली आहे. याअंतर्गत आता ग्राहक 5 वेळा 'पैसे न देता' रिचार्ज करता येणे शक्य आहे. ही Emergency Data Loan सेवा असेल जी, दररोजची डेटा मर्यादा संपल्यानंतर वापरकर्ते वापरू शकतात आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय हाय-स्पीड डेटा वापरु शकतील.

1 पॅकची किंमत फक्त 11 रुपये आहे

कंपनीच्या म्हणण्यानुसार ही, सेवा खास त्या लोकांसाठी आहे. ज्यांना दररोज मिळणारा 4 जी इंटरनेट डेटा कमी पडतो. असे ग्राहक आता त्यांचा दैनंदिन डेटा संपल्यानंतर या रीचार्जचा वापर करु शकतील. Emergency Data Loan सुविधे अंतर्गत त्यांना 'Recharge Now and Pay Later' सुविधा उपलब्ध आहे.

ही सुविधा प्रीपेड वापरकर्त्यांना प्रत्येकी 1 जीबीच्या 5 Emergency Data Loan पॅक ची किंमत 11 रुपये आहे आणि ते उधार घेण्याची परवानगी कंपनी ग्राहकांना देते.

आपण Jio अ‍ॅपवरुन असे रीचार्ज करू शकता

सर्वप्रथम आपल्याला MyJio अ‍ॅपवर जावे लागेल. येथे तुम्हाला डाव्या बाजूला मेनूचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला मोबाइल सेवां अंतर्गत Emergency Data Loan उघडावे लागेल. त्यानंतर Emergency Data Loanच्या बॅनरवर क्लिक करा.

येथे Get Emergency Data पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला Activate Now चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि तुमचा Emergency Data Loan योजना सक्रिय करा.