Jio चा भन्नाट प्लॅन, Free कॉलिंगसह Netflix आणि Amazon Prime चा ही फायदा!

Jio Recharge Plan : तुम्ही जर जिओ फोन वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी एक स्वस्तात मस्त प्लान संबंधित या ठिकाणी माहिती देत आहोत. जाणून घ्या या प्लॅनची सविस्तर माहिती...

Updated: May 28, 2023, 04:52 PM IST
Jio चा भन्नाट प्लॅन, Free कॉलिंगसह Netflix आणि Amazon Prime चा ही फायदा! title=
Jio Recharge Plan

Jio Recharge Plan :  Jio कंपनी वापरकर्त्यांसाठी असे काही प्लॅन उपलब्ध करीत आहे. जे वापरकर्ते कमी खर्चात अधिक फायदे देतात. काही वापरकर्ते सेकंडरी सिमचा वापर करतात. त्यांना स्वस्त प्लॅनची (Jio Recharge Plan) गरज पडते. अशा वापरकर्त्यांसाठी जिओने एक खास प्लॅन आणला आहे. या प्लॅनचा फायदा घेऊन तुम्ही संपूर्ण महिनाभर मोफत डेटा आणि कॉलिंगचा लाभ मिळवू शकता. तर तुम्हाला या ऑफरचा लाभ घेयाचा असेल तर 7000070000 वर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 399 आणि 699 रुपयांचे रिचार्ज करू शकता. पण ही ऑफर एका महिन्यासाठी मोफत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणाचा विलंब न  करता या ऑफरचा वेळीच लाभ घ्या...

399 रुपयांचा प्लॅन

जिओ तुमच्यासाठी 399 रुपयांचा प्लॅन घेऊन आला आहे. यामध्ये कुटुंबातील तीन सदस्य जोडता येतील. प्रत्येक सदस्यानुसार 99 रुपये स्वतंत्रपणे भरावे लागतील. या प्लॅनमध्ये 75 जीबी डेटा दिला जाईल. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंग ऑफर देण्यात आली आहे. या निवडलेल्या लोकांची सिक्योरिटी डिपॉजिटी द्यावी लागेल. तसेच ही योजना 4 सदस्यांसह समान योजनेची किंमत सुमारे 694 रुपये असणार आहे.

वाचा: तुम्ही खात असलेल्या पदार्थांमध्ये असते 'दारु', नाव वाचून तुम्हीही व्हाल चकीत 

699 फॅमिली प्लॅन

या प्लॅनमध्ये 100 GB डेटा दिला जातो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग देखील दिले जाते. यामध्ये कुटुंबातील केवळ 4 सदस्य जोडले जाणार आहेत. यासोबतच या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमचे फ्री सब्सक्रिप्शनही उपलब्ध आहे. या प्लॅनमधील कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून 99 रुपये स्वतंत्रपणे आकारले जातील. एकूण 4 सदस्य असलेल्या या योजनेची किंमत सुमारे 1196 रुपये असेल.

91 रुपयांच्या प्लॅनमध्ये सर्व काही

91 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सला अनेक फायदे मिळतील. 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. तुम्हाला कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लॅनमध्ये कॉलिंगच्या सुविधे सोबत डेटा बेनिफिट्स सुद्धा दिले जात आहे. रोज यूजर्सला 100 एमबी डेटा दिला जातो. तसेच 200 एमबी अतिरिक्त डेटा दिला जातो. एकूण पूर्ण वैधते दरम्यान 3 जीबी डेटाचा लाभ मिळतो. हाय स्पीड इंटरेनेट संपल्यानंतर स्पीज कमी होवून 64 kbps राहते.