खूशखबर ! लवकरच लॉन्च होणार जिओचा स्मार्टफोन तेही फक्त ५०० रुपयात

दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ आता मोबाईल फोन इंडस्ट्रीजमध्ये देखील पाऊल टाकत आहे. रिलायन्स जिओ मार्केटमध्ये लवकरच आपला नवीन 4 जी फोन आणणार आहे. या फोनसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतील कारण तो फक्त ५०० रुपयांचा असणार आहे. 

Updated: Jul 5, 2017, 01:15 PM IST
खूशखबर ! लवकरच लॉन्च होणार जिओचा स्मार्टफोन तेही फक्त ५०० रुपयात title=

मुंबई : दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ आता मोबाईल फोन इंडस्ट्रीजमध्ये देखील पाऊल टाकत आहे. रिलायन्स जिओ मार्केटमध्ये लवकरच आपला नवीन 4 जी फोन आणणार आहे. या फोनसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतील कारण तो फक्त ५०० रुपयांचा असणार आहे. 

इकॉमॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार रिलायन्स जिओ आपला 4 जी फोन बाजारात आणणार आहे. अहवालानुसार फोनचं लाँचिंग 21 जुलैला होऊ शकते.  रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक बैठकी दरम्यान होऊ शकते. जुलै अखेरीस संपत असणाऱ्या धन धना धन प्लान सोबत हा फोन लॉन्च केला जावू शकतो.

एचएसबीसीचे संचालक आणि दूरसंचार विश्लेषक राजजित शर्मा यांच्या माहितीनुसार या फोनची किंमत 500 रुपये आहे.  2 जी वापरकर्त्यांना थेट 4 जी सेवेशी जोडण्यासाठी जिओ हा फोन लॉन्च करत आहे. म्हणजेच प्रत्येक हँडसेटवर 10 ते 15 डॉलर्स म्हणजेच 650 ते 975 रुपये जिओ सब्सिडी देणार आहे.

अलिकडेच काऊंटरप्वाइंट रिसर्चमध्ये असे म्हटले आहे की पुढील 12 महिन्यात 3 पैकी 2 उपभोक्ते नवीन फोन घेतील. 4 जी सपोर्ट, चांगली मेमरी आणि बॅटरी हे वैशिष्ट्य असणारे फोन ग्राहकांना आकर्षित करतील. आणि जिओ अशाच वैशिष्टयांसह हा फोन लॉन्च करण्याचा तयारीत आहे. जिओ सध्या एकमेव अशी कंपनी आहे जी ४ जी VoLTE सपोर्ट देते. तर एअरटेल, वोडाफोन आणि आइडिया सारख्या इतर दूरसंचार कंपन्यांकडून अजून त्याची ट्रायल केली जात आहे.