खूशखबर ! जिओने आणली आणखी एक धमाकेदार ऑफर

दूरसंचार क्षेत्रात आपलं वर्चस्व बनवणारी कंपनी रिलायन्स जिओने आणखी एक उत्तम ऑफर बाजारात आणली आहे. आपल्या नवीन ऑफर अंतर्गत जिओ 224 जीबी पर्यंत 4G डेटा देत आहे. जिओने आपला डेटा प्लॅन आणण्याआधीच इतर कंपन्यांची झोप उडवली होती. त्यानंतर आता आणखी नवीन ऑफर जिओने आणली आहे.

Updated: Jul 5, 2017, 11:23 AM IST
खूशखबर ! जिओने आणली आणखी एक धमाकेदार ऑफर title=

मुंबई : दूरसंचार क्षेत्रात आपलं वर्चस्व बनवणारी कंपनी रिलायन्स जिओने आणखी एक उत्तम ऑफर बाजारात आणली आहे. आपल्या नवीन ऑफर अंतर्गत जिओ 224 जीबी पर्यंत 4G डेटा देत आहे. जिओने आपला डेटा प्लॅन आणण्याआधीच इतर कंपन्यांची झोप उडवली होती. त्यानंतर आता आणखी नवीन ऑफर जिओने आणली आहे.

जिओची धन धना धन ऑफर जुलैच्या अखेरीस संपणार आहे. आता ग्राहकांना सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिन्यात रिचार्ज करणे आवश्यक आहे. हा नवीन प्लॅन ग्राहकांना नवीन जिओ फाई किंवा नवीन सिम खरेदी केल्यावर मिळेल. यासाठी ग्राहकांना 99 रुपयांची प्राईम मेंबरशिप घ्यावी लागेल. त्यानंतर 149, 309 आणि 509 या पैकी एका प्लॅनची ​​निवड करावी. लागेल.

149 रुपयाचा प्लॅन घेतल्यास दरमहिन्याला 2 जीबी 4 जी डेटा एक वर्षापर्यंत मिळेल. यासाठी 12 विनामूल्य रिचार्ज सायकल असेल. याचप्रमाणे 309 रुपयांच्या  प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी 4 जी डेटा 6 महिने मिळेल. यासाठी 6 मोफत रिचार्ज सायकल असेल. याचा अर्थ तुम्हाला 168 जीबी डेटा मिळेल. 509 रुपयांच्या पॅकमध्ये 4 महिने रोज 2 जीबी 4 जी डेटा मिळेल यामध्ये 28 दिवसाच्या रिचार्जच्या हिशोबाने 4 रिचार्ज सायकल असेल. यानुसार तुम्हाला 509 रुपयांच्या पॅकमध्ये 224 जीबी डेटा मिळेल.