जिओची ऑफर, ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये १०० रुपयांचा डिस्काऊंट

 या प्लानमधील रिचार्ज केल्यावर ग्राहकांना १०० रुपयांची कॅशबॅक मिळणार असल्याने या प्लानची किंमत २९९ रुपये होणार आहे.

Updated: Jun 2, 2018, 07:33 PM IST
जिओची ऑफर, ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये १०० रुपयांचा डिस्काऊंट title=

मुंबई : जिओ कंपनीने प्रीपेड ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉलीडे हंगामा ऑफर आणली आहे. ही ऑफर कंपनीच्या ३९९ रुपयांच्या प्लानसाठी देण्यात आली आहे. या प्लानमधील रिचार्ज केल्यावर ग्राहकांना १०० रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. त्यामुळे या प्लानची किंमत २९९ रुपये होणार आहे. हॉलीडे हंगामा ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहे. १ जून ते १५ जून पर्यंत ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये १०० रुपयांचा कॅशबॅक मिळविण्यासाठी तुम्हाला PhonePe अॅप मधून रिचार्ज कराव लागणार आहे. मायजिओ अॅपमधूनदेखील हा रिचार्ज करता येणार आहे.

असा मिळेल कॅशबॅक   

१०० रुपयांचा कॅश बॅक ग्राहकांना दोन भागांमध्ये मिळणार आहे. जर तुम्ही मायजिओ अॅपमधून रिचार्ज केल्यास तुम्हाला ५० रुपयांचा कॅशबॅक वाऊचर दिले जाईल. यानंतर तुम्हाला ५० रुपयांच डिस्काऊंटही दिल जाणार आहे. तसेच मायजिओ अॅपवर PhonPe द्वारे रिचार्ज केल्यास तुम्हाला ५० रुपयांच कॅशबॅक मिळणार आहे.