मुंबई : आता जवळ-जवळ सगळ्याच टॅलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केल्या आहेत. ज्यामुळे प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांमध्ये फारसा फरक राहिला नाहीय. बरेच लोक असे आहेत की, जे कंपनीची प्रिपेड सर्विस वापरतात. परंतु तुम्हाला माहितीय काही कंपन्या आपल्या पोस्टपेड ग्रहकांना चांगल्या सुविधा देत आहेत. ज्यामुळे एका रिचार्जमध्ये तुम्ही आणि तुमचं कुटुंब सर्विस वापरत आहे.
या पोस्टपेडमध्ये प्लानमध्ये तुम्हाला फॅमिली कनेक्शनची सुविधाही दिली जाते. दूरसंचार कंपन्यांकडे अशा अनेक पोस्टपेड योजना आहेत, जे तुम्हाला सरासरी किमतीत चांगले फायदे देतात. येथे आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या परवडणाऱ्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगत आहोत.
Jio चा 799 रुपयांचा महिन्याच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये, तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसाठी दोन अतिरिक्त सिम कार्डांसह एक प्राथमिक सिम दिले जाते. यामध्ये तुम्हाला एकूण 150 GB डेटा मिळेल, पण तुम्ही 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर करू शकता. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतात.
पोस्टपेड प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना अनेक OTT प्लॅटफॉर्मची सदस्यत्व मिळते. जिओच्या प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने प्लस हॉटस्टारसह जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
Jio प्रमाणे, Airtel च्या या प्लॅनमध्ये सुद्धा दोन फॅमिली सिम आणि एक रेग्युलरची सुविधा आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 100 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS चा लाभ मिळेल. यामध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार मेंबरशिप, एअरटेल एक्सट्रीम आणि विंक म्युझिक यांसारखी मेंबरशिप अॅमेझॉन प्राइमवर मोफत उपलब्ध आहे.