मोबाईलवर सतत गेम खेळणे असे धोकादायक!

सध्या स्मार्टफोनचा वापर दिवसागणिक वाढत आहे. त्याचबरोबर टाइमपास म्हणून मोबाईल गेम खेळला जातो. नंतर नंतर गेमचे सवय होते. मात्र, ही सवय तुम्हाला बैचेन करते तेव्हा समजून जा की ते तुमच्यासाठी धोकादायक आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 11, 2018, 11:55 PM IST
मोबाईलवर सतत गेम खेळणे असे धोकादायक! title=

मुंबई : सध्या स्मार्टफोनचा वापर दिवसागणिक वाढत आहे. त्याचबरोबर टाइमपास म्हणून मोबाईल गेम खेळला जातो. नंतर नंतर गेमचे सवय होते. मात्र, ही सवय तुम्हाला बैचेन करते तेव्हा समजून जा की ते तुमच्यासाठी धोकादायक आहे.

एकटे असताना किंवा अर्धा तास मोबाईलमधील गेम खेळणे एखादवेळी ठिक आहे. तसेच एखाद्या कार्यक्रमातही एकटे बसून गेम खेळण्याचे व्यसन सध्या अनेकांना असते. सुरुवातीला टाइमपास किंवा विरंगुळा म्हणून खेळल्या जाणाऱ्या गेमिंगचं हळूहळू व्यसन लागते ते कळत नाही.

धोक्याचा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबाबत अभ्यास केला. त्यावेळी धक्कादायक वास्तव पुढे आलेय. WHOने प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात अनुमान काढण्यात आलेय. तुम्ही किंवा तुमच्या आसपासचे कोणी अशाप्रकारे मोकळ्या वेळी सतत मोबाईलवर गेम खेळत असतील तर त्यांना नक्कीच एखादा आजार झाला आहे हे लक्षात घ्यावे. 

दिवसातला थोडा वेळ गेम खेळणे ठिक आहे. पण गेमिंगच्या सवयींना गंभीर आजार म्हणून घोषित केलंय. त्यामुळे जास्त वेळ गेम खेळणं हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक धोकादायक आहे.

गेममुळे हे आजार जडतात

 WHOने गेमच्या आजाराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील यादी जाहीर केलेय. यामध्येही ‘घातक गेमिंग’ (hazardous gaming) आणि ‘गेमिंग डिसऑर्डर’ (gaming disorder) असे दोन प्रकार दिलेत.

गेमिंगची सवय व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करते. विशेष म्हणजे सध्या केवळ तरुण-तरुणींनाच हा आजार झाला आहे असे नाही तर ज्येष्ठांनाही काही प्रमाणात हा आजार जडल्याचे सांगण्यात येते. 

विशिष्ट गेमच्या पुढच्या लेव्हल्स पार करण्याची उत्सुकता राहते. गेम खेळल्यावर येणारे फीडबॅक असं हे चक्र सतत सुरु राहते आणि ती व्यक्ती त्या गेममध्ये अडकून जातो.

तासनतास गेम खेल्यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. मात्र हे व्यसन गंभीर रुप धारण करण्याच्या आतच योग्य ती काळजी घेतली पाहिजे, हे मात्र खरं.