मुंबई : iQOO Z5 2022 Specifications Tipped:मार्केटमध्ये जबरदस्त मोबाईल येत आहे. स्मार्टफोन ब्रँड iQOO ने तगडा मोंबाईल iQOO Z5 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. या स्मार्टफोनचे नवीन मॉडेल येत्या काही दिवसात लॉन्च केले जाऊ शकते. या स्मार्टफोनबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी लीकच्या माध्यमातून याच्या फीचर्सबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. iQOO Z5 5G च्या नवीन मॉडेलबद्दल तपशीलवार अधिक जाणून घ्या.
चीनी स्मार्टफोन ब्रँड iQOO येत्या काही दिवसात आपल्या स्मार्टफोनचे नवीन मॉडेल iQOO Z5 5G लॉन्च करणार आहे. चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo च्या टेक ब्लॉगर @DCS ने या स्मार्टफोनबद्दल माहिती प्रसिद्ध केली आहे. या तगड्या मोबाईल iQOO Z5 मध्ये जम्बो बॅटरीसह एक अप्रतिम डिस्प्ले मिळू शकतो.
या स्मार्टफोनची चर्चा त्याच्या जबरदस्त बॅटरीमुळे होत आहे. iQOO Z5 च्या आधीच्या मॉडेलमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली होती, तिथे तुम्हाला 6000mAh बॅटरी मिळू शकते. अधिकृत चाचणी डेटावरून मिळालेल्या माहितीनुसार, iQOO Z5 2022 वर चार दिवस चार्ज न करता गाणी ऐकू शकता. इतकेच नाही तर या फोनवर तुम्ही 10.4 तास नॉन-स्टॉप गाणी ऐकू शकता, 18.3 तास व्हिडिओ पाहू शकता आणि चार्जिंगशिवाय एक दिवस फोन वापरु शकता. 6000mAh बॅटरीसह, हा फोन 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकतो.
iQOO Z5 च्या बाकीच्या फीचर्सबद्दल माहिती जाणून घ्या. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरवर काम करू शकतो आणि यामध्ये तुम्हाला 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते. या ड्युअल सिम स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.58-इंचाचा हाय क्वालिटी LCD फुल स्क्रीन देण्यात आला आहे.
iQOO Z5 5G या फोनमध्ये तुम्हाला 6.67-इंच फुल एचडी + एलसीडी स्क्रीन, 2,400 x 1,080 पिक्सेलचे रिझोल्यूशन आणि 120Hz चा रिफ्रेश रेट दिला जात आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर iQOO Z5 मध्ये तुम्हाला 64MP मुख्य सेन्सर आणि 16MP फ्रंट कॅमेराचा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरवर काम करणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ड्युअल सिम सेवा, 3.5mm हेडफोन जॅक, 5,000mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.