मध्यमवर्गीयांच्या घराघरात पोहोचवली कार? सोबत उभारला 7 हजार कोटींचा प्लॅटफॉर्म

त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबांची आणि त्यांच्या गरजांची नाडी पकडली त्याला समजून घेतले, त्यामुळेच CarTradeला मोठ्या उंचीवर घेऊन जाणे शक्य झाले.

Updated: Aug 11, 2021, 09:02 PM IST
मध्यमवर्गीयांच्या घराघरात पोहोचवली कार? सोबत उभारला 7 हजार कोटींचा प्लॅटफॉर्म title=

मुंबई : ऑनलाइन ऑटो प्लॅटफॉर्म CarTrade च्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 9 ऑगस्ट रोजी उघडलेला IPO हा 11 ऑगस्ट रोजी बंद होणार आहे, तर 17 ऑगस्ट 2021 रोजी शेअर्सचे वाटप होण्याची शक्यता आहे. CarTrade टेकच्या IPOसाठी किंमत बँड 1 हजार 585 ते 1 हजार 618 रुपयांच्या दरम्यान निश्चित करण्यात आले आहे. CarTrade ही विनय संघी यांची कंपनी आहे. ते या कंपनीचे सहसंस्थापक (Vinay Sanghi) आहे. त्यांनी 2009 मध्ये राजन मेहरा यांच्यासह १ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने या कंपनीची सुरुवात केली. एका अहवालानुसार, 31 मार्च 2021 पर्यंत CarTradeचे बाजार मूल्यांकन 7 हजार 100 कोटी रुपये होते.

विनय संघी यांनी भारतीय मध्यमवर्गाला ऑनलाइन प्लॅटफॉर्म ते IPO पर्यंतच्या प्रवासात अगदी जवळून पाहिला आहे. त्याचा परिणाम असा झाला की, त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबांची आणि त्यांच्या गरजांची नाडी पकडली त्याला समजून घेतले, त्यामुळेच CarTradeला मोठ्या उंचीवर घेऊन जाणे शक्य झाले.

त्यांचे कुटुंब व्यवसाय ऑटोशी संबंधित असल्याने विनय संघीला या बाजाराची आधीच चांगली समज होती. त्याला खूप लवकर आणि चांगले समजले की ऑनलाइन बाजारपेठेत प्रवेश झपाट्याने वाढत आहे आणि भारतीय मध्यमवर्गीय किरकोळ दुकान तसेच ऑनलाइन कार खरेदी करण्याचे मार्ग शोधत आहेत.

त्याला हे देखील माहित होते की, नवीन कार खरेदी करणे प्रत्येकासाठी शक्य नाही. लोक एक व्यासपीठ शोधत आहेत जिथे ते वापरलेल्या कार खरेदी आणि विक्री करू शकतात आणि कार खरेदी करण्यासाठी लागणारा वेळ देखील कमी लागल. म्हणून सांघी यांनी 2009 मध्ये महिंद्रा फर्स्ट चॉईसला सोडले आणि Cartrade.com चा जन्म झाला.

2012 मध्ये फ्रँचायझी स्टोअर उघडले

विनय सांघी यांनी 1 कोटी रुपयांनी आपली कंपनी सुरू केली. CarTrade लाँच केल्याच्या दोन महिन्यांनंतर, त्याला एका गुंतवणूकदाराचा फोन आला त्यानंतर CANAN पार्टनर्स, एक अमेरिकन टेक गुंतवणूकदाराने CarTrade मध्ये 10 लाख डॉलर्सला गुंतवले. त्यानंतर, जसजसा वेळ गेला, कंपनीचा निधी आणि गुंतवणूकदारांची संख्या वाढत गेली.

Cartrade.com ने 2012 च्या अखेरीस फ्रेंचायजी स्टोअर सुरू झाले. त्यानंतर ऑक्टोबर 2013 मध्ये कंपनीने आपले 18 वे फ्रेंचाइजी स्टोअर उघडले. वर्ष 2015 मध्ये, कंपनीने CarWale कंपनी खरेदी केली आणि नवीन कारच्या व्यवसायात प्रवेश केला.

जुन्या गाड्यांपासून सुरुवात का?

भारताता युझ्ड किंवा वापरलेल्या कारला बाजारपेठत जास्त मागणी आहे आणि ती वाढणार आहे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांना हे माहित होते की, प्रत्येक भारतीयाचे हे स्वप्न आहे की, त्याच्याकडे कार असावी परंतु सगळ्यांनाच नवीन कार विकत घेणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा बिझनेस करण्याचा विचार केला. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ही कंपनी उघडण्याचा विचार घेतला कारण त्याचा सर्वात मोठा फायदा असा होता की, सर्व इन्व्हेंटरी एकाच प्लॅटफॉर्मवर दाखवता येतात.

2020-21 मध्ये CarTrade टेकचे उत्पन्न 250 कोटी रुपये होते आणि नफा 35 कोटी रुपये होता. 31 मार्च, 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत CarTrade, CarWale आणि BikeWale यांना दरमहा सुमारे 3.2 कोटी ग्राहक मिळाले. कंपनीच्या ब्रँडमध्ये CarWale, CarTrade, Shriram Automall, BikeWale, CarTradeExchange, Adroit Auto आणि AutoBiz  यांचा समावेश आहे.