Apple iPhone महागला ! या प्रोडक्ससाठी मोजावे लागणार अधिक पैसे

घड्याळ्यांपासून, टॅबलेट, लॅपटॉप आणि मोबाईलपर्यंत अ‍ॅपलची अनेक प्रोडक्स लोकं केवळ त्याच्या ब्रॅन्ड व्हॅल्यूवर विश्वास ठेवून विकत घेतात. अनेकांना 'अ‍ॅपल' प्रोडक्सचे वेड आहे. पण भविष्यात तुम्ही 'अ‍ॅपल'चे प्रोडक्ट विकत घेणार असाल तर तुमचा खिसा अधिक मोकळा होऊ शकतो. कारण अ‍ॅपलने त्यांच्या प्रोडक्सच्या किंमती वाढवल्या आहेत.   

Updated: Feb 5, 2018, 06:06 PM IST
Apple iPhone महागला ! या प्रोडक्ससाठी मोजावे लागणार अधिक पैसे  title=

मुंबई : घड्याळ्यांपासून, टॅबलेट, लॅपटॉप आणि मोबाईलपर्यंत अ‍ॅपलची अनेक प्रोडक्स लोकं केवळ त्याच्या ब्रॅन्ड व्हॅल्यूवर विश्वास ठेवून विकत घेतात. अनेकांना 'अ‍ॅपल' प्रोडक्सचे वेड आहे. पण भविष्यात तुम्ही 'अ‍ॅपल'चे प्रोडक्ट विकत घेणार असाल तर तुमचा खिसा अधिक मोकळा होऊ शकतो. कारण अ‍ॅपलने त्यांच्या प्रोडक्सच्या किंमती वाढवल्या आहेत.   

का वाढल्या किंमती ? 

सरकारने सीमा शुल्क वाढवल्याने काही दिवसातच अ‍ॅपल आयफोनने त्याच्या अनेक मॉडल्सच्या किंमती वाढवल्या आहेत. यामध्ये विविध प्रोडक्सवर 3210 रूपयांपर्यत वाढ झाली आहे.  

कशा-कशाच्या किंमती वाढल्या ? 

अ‍ॅपल वॉचची किंमत 2510 रूपयांनी वाढवली आहे. 

256 जीबी - अ‍ॅपल मोबाईल एक्सची किंमत 3210 रूपयांनी वाढल्याने 1,08,930 रुपयेझाली आहे.  

आयफोन 6 (32 जीबी) मोबाईलच्या किंमतीअम्ध्ये 1120 रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हा फोन आरा 31,900 रूपयांमध्ये मिळणार आहे.

आयफोन एसई हा भारतात विस्ट्रोन द्वारा अस्मॅबल करून बनवला जातो. त्यामुळे त्याच्या किंमतीत वाढ होणार नाही. 

अ‍ॅपल वॉच महागणार  

अ‍ॅपल वॉचवरही सीमा शुल्क  वाढवल्याचा परिणाम दिसणार आहे. अ‍ॅपल वॉचच्या किंमतीमध्ये 7.9% वाढ होणार आहे. नव्या किंमती आजपासून लागू होणार आहेत. 

एपल वॉच सीरीज 3 38 एमएमची किंमत आता 34,410 होणार आहे. 

गेल्या काही महिन्यात दुसर्‍यांदा सीमा शुल्क वाढवले गेले आहेत. सोबतच इम्पोर्ट चार्जदेखिल 10 वरून 15 % वाढ करण्यात  आली आहे.