पाहा, भारतात कधीपासून मिळणार iPhone X, काय असेल किंमत?

अॅप्पलचा आयफोन एक्स खरेदी करण्यासाठी भारतीय ग्राहकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.

Updated: Sep 13, 2017, 05:33 PM IST
पाहा, भारतात कधीपासून मिळणार iPhone X, काय असेल किंमत? title=

मुंबई : अॅप्पलचा आयफोन एक्स खरेदी करण्यासाठी भारतीय ग्राहकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.

अ‍ॅप्पल कंपनीने त्यांचे तीन नवीन दमदार आयफोन लॉन्च केले आहेत. हे फोन लवकरच भारतात उपलब्ध होतील. कंपनीने एकत्र iPhone X, iPhone 8 आणि iPhone 8 प्लस हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

iPhone X हा प्रीमियम फोन भारतात ३ नोव्हेंबर २०१७ मध्ये भारतात विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. अॅप्पलच्या दहाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा फोन लॉन्च करण्यात आला. 

अॅप्पलचा हा पहिलाच फोन आहे ज्याच होम बटन देण्यात आलेलं नाही, त्यामुळेच तो इतर फोनपेक्षा वेगळा ठरलाय. 

भारतात अॅप्पल iPhone X (64GB) ची किंमत 89,000 रुपये असेल तर अॅप्पल iPhone X (256GB) ची किंमत 1,02,000 रुपये राहील.