Apple कंपनीला मोठा झटका, iPhone 14 ने दिला धक्का

iphone 14 लॉन्च झाला आहे. पण या फोनमुळे कंपनीला काही प्रमाणात धक्का बसण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 29, 2022, 07:15 PM IST
Apple कंपनीला मोठा झटका, iPhone 14 ने दिला धक्का title=

मुंबई : Apple ने नुकतीच iPhone 14 सीरीज लाँच केली. या सीरीजमध्ये कंपनीने चार नवीन हँडसेट बाजारात आणले आहेत. पण या फोनला हवा तितका प्रतिसाद मिळालेला दिसत नाहीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने आयफोन 14 चे उत्पादन वाढवण्याची योजना काही काळासाठी होल्डवर ठेवली आहे. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीला ही धक्का बसला आहे. (iphone 13 vs iphone 14)

तुम्हाला iPhone 14 आणि iPhone 13 मध्ये कोणताही मोठा फरक दिसणार नाही. दोन्ही स्मार्टफोन जवळपास सारखेच आहेत. ऍपल वापरकर्त्यांना जुने डिझाईन्स मिळणे ही नवीन गोष्ट नाही. याआधीही कंपनीने जवळपास सारख्याच डिझाईनचे फोन लॉन्च केले आहेत, परंतु यावेळी डिझाईनसह अनेक गोष्टी जुन्याच आहेत.

कंपनीने iPhone 14 मध्ये iPhone 13 चे डिझाइन, डिस्प्ले आणि प्रोसेसर दिले आहेत. कॅमेरा कॉन्फिगरेशन देखील समान आहे. युजर या फोनला iPhone 14 न म्हणता iPhone 13 2022 म्हणत आहेत.

दोन्ही फोनच्या किंमतीत मोठा फरक आहे. आयफोन 13 ची किंमत नवीन मॉडेलपेक्षा खूपच कमी आहे. यामुळेच लोकं नवीन व्हेरियंट खरेदी करण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीयेत.

Apple 90 लाख युनिट्सऐवजी फक्त 60 लाख आयफोन 14 चे उत्पादन करणार आहे. प्रो मॉडेल्सच्या बाबतीत असे नाही. Apple ने iPhone 14 Pro सीरीजमध्ये अनेक बदल केले आहेत.

यामध्ये ग्राहकांना नवीन प्रोसेसरसह नवीन डिस्प्ले आणि नवीन कॅमेरा सेटअप देखील मिळेल. iPhone 14 Plus बद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. हा स्मार्टफोन अद्याप विक्रीसाठी आलेला नाही.