सेल्फी प्रेमींसाठी 'इंटेक्स'चा बजेट स्मार्टफोन बाजारात

सेल्फी प्रेमींसाठी इंटेक्स टेक्नोलॉजीनं एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केलाय.

Updated: Jul 18, 2017, 02:40 PM IST
सेल्फी प्रेमींसाठी 'इंटेक्स'चा बजेट स्मार्टफोन बाजारात title=

मुंबई : सेल्फी प्रेमींसाठी इंटेक्स टेक्नोलॉजीनं एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केलाय. १७ जुलै रोजी ऑफलाइन चॅनेलवर ‘एक्वा सेल्फी’ हा बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आलाय. 

अॅक्वा सेल्फी हा ४जी/ व्हीएलटीइटी हा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये फ्रंट आणि बँक एलईडी फ्लॅश पॉवर ५ मेगापिक्सल फ्रंट आणि ८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा उपलब्ध आहे.

आजची पिढी सेल्फी पिढी म्हणून ओळखली जाते. फ्रंट एलईडी फ्लॅश पॉवर ‘अॅक्वा सेल्फी’मध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे, युझर्सना अंधारातही सेल्फी काढता येणार आहे. या स्मार्टफोनची बॅटरीही दमदार आहे.

५.५ इंच एचडी-आयपीएस डिस्प्लेसह, १.३ जी एच झेड क्वाड कोर प्रोसेसर यात आहे. यात २ जीबी रॅम आणि १६ जीबी इनबिल्ट मेमरी उपलब्ध आहे. मेमरी कार्डच्या साहाय्याने ती तुम्हाला ६४ जीबीपर्यंत वाढवता येईल.

‘अॅक्वा सेल्फी’मध्ये संगीत, व्हिडीओ ही वैशिष्टये आहेत. ‘गाना’ तसेच प्राईम व्हिडीओचा देखील यात समाविष्ट आहे. युझर्सना त्यांची आवडती गाणी, लोकप्रिय चित्रपट आणि टीव्ही शोज, डाऊनलोड करण्याची अनुमती दिली आहे. या स्मार्टफोनची किंमत ६,६४९ रुपये निर्धारीत करण्यात आलीय.