Instagram क्रॅश : अ‍ॅप पुन्हा सुरू करण्यासाठी Instagram चा सल्ला

आजकाल अनेकांच्या दिवसाची सुरूवात फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अपडेट्स चेक केल्याने होते. 

Updated: Jun 6, 2018, 12:28 PM IST
Instagram क्रॅश : अ‍ॅप पुन्हा सुरू करण्यासाठी Instagram चा सल्ला  title=

 मुंबई : आजकाल अनेकांच्या दिवसाची सुरूवात फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अपडेट्स चेक केल्याने होते. पण कालपासून इंस्टाग्रामचं अ‍ॅप सुरू होत नसल्याने जगभरातील युजर्स अस्वस्थ झाले आहेत.  

 अ‍ॅन्ड्रॉईडवर इंस्टाग्राम क्रॅश    

 फोटो शेअर करण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाणारे इंस्टाग्राम हे अ‍ॅप  जगभरात वापरले जाते. मात्र दुपारपासून इंस्टाग्राम अ‍ॅन्ड्राईडवर सुरळीत चालत नसल्याने युजर्स मात्र अस्वस्थ झाले होते.  
 इंन्स्टाग्राम क्रॅश झाल्याची तक्रार जगभरातील अ‍ॅन्ड्रॉड युजर्सने केली आहे. अ‍ॅपल युजर्सना मात्र इंस्टाग्राम  वापरताना त्रास होत नसल्याचे चित्र आहे.   

 काय आहे इन्स्टाग्रामचं मत?  

 

 इंस्टाग्राम सुरळीत काम करत नसल्याची कबुली कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यानंतर कंपनीने युजर्सची माफी मागत ही समस्या दूर केल्याची माहिती दिली आहे. तर युजर्सना इंस्टाग्राम हाताळताना त्रास होत असल्यास तो पुन्हा इंस्टॉल किंवा अपडेट करण्याचा सल्ला इंस्टाग्रामने ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून दिले आहे.