खाण्यापिण्यासाठी नव्हे, 'या' ऍपवर सर्वाधिक पैसे उधळतात भारतीय

नोकरी आणि मनोरंजनावर कमी खर्च, पण.....

Updated: Jan 21, 2020, 08:43 AM IST
खाण्यापिण्यासाठी नव्हे, 'या' ऍपवर सर्वाधिक पैसे उधळतात भारतीय  title=
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : भारतामध्ये तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, कितीही प्रगती झाली तरीही अमुक एका गोष्टीसाठी विशेष म्हणजे कोणा एका ऍपसाठी वगैरे तर, खर्च करण्यात आजही भारतीय मागे आहेत. अर्थात त्याला एक अपवादही आहे. 

एका निरिक्षणातून सिद्ध झाल्यानुसार भारतीय युजर्स हे डेटिंग ऍपवर सर्वाधिक पैसे खर्च करतात. App Annieने मोबाईल वापरणाऱ्यांविषयी केलेल्या एका निरिक्षणातून ही बाब आढळली. टिंडर या डेटिंग साईटवर जास्तीत जास्त खर्च करण्याची तयारी भारतीयांकडून दाखवण्यात येते. 

नोकरी आणि मनोरंजनावर कमी खर्च 

कोणत्याही ऍपसाठी पैसे खर्च करण्याच्या बाबतीत भारतीयांचा दृष्टीकोन स्पष्ट असल्याचं या निरिक्षणातून स्पष्ट झालं. जिथे टिंडर या डेटिंग ऍपसाठी भारतीय अधिकाधिक खर्च करताना दिसतात तिथेच, Netflix आणि Hotstar वर पैसे खर्च करण्याच्या बाबतील मात्र ते काहीसे मागे आहेत. इतकच नव्हे तर नोकरी शोधण्यासाठी मदतीचे ठरणारे ऍपही टिंडवर मात करु शकलेले नाहीत. पैसे खर्च करुन वापरता येणाऱ्या या ऍपच्या याद्यांमध्ये Linkedin दहाव्या स्थानावर आहे. 

Tinder में सबसे ज्यादा पैसा लुटा रहे हैं भारतीय, जानिए मोबाइल यूजर्स की हैरान करने वाली बातें

वाचा : 'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप

Tinder आहे तरी काय? 

Tinder हे फक्त भारतातच नव्हे, तर साऱ्या जगामध्ये चर्चेत असणारं ऍप आहे. डेटिंग ऍप अशीच त्याची ओळख. एकमेकांच्या आवडीनिवडी, विचार जुळणाऱ्या व्यक्ती या ऍपवर भेटतात. शिवाय आपण ज्या भागात आहोत, तेथे असणाऱ्या इतर Tinder युजर्सविषयीसुद्धा या ऍपच्या माध्यमातून माहिती मिळते. गेल्या काही वर्षांपासून या ऍपची  भारतात प्रचंड चलती पाहाला मिळत आहे. Tinder व्यतिरिक्त भारतीयांकडून फेसबुक, व्हॉट्सऍप, फेसबुक मेसेंजर आणि शेअर इट अशा ऍपचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.