पासवर्ड सेट करण्याचा भारतीयांना कंटाळा, हलगर्जीपणा पडणार महागात

ऑनलाईन माध्यमातून संवाद, आर्थिक व्यवहार इत्यादी अनेक कामे लगेच होतात.

Updated: Nov 22, 2021, 11:53 AM IST
पासवर्ड सेट करण्याचा भारतीयांना कंटाळा, हलगर्जीपणा पडणार महागात title=

नवी दिल्ली : 21 व्या शतकात जग जवळ आहे. इंटरनेट हे त्यामागचे महत्वाचे कारण आहे. ऑनलाईन माध्यमातून संवाद, आर्थिक व्यवहार इत्यादी अनेक कामे लगेच होतात. ऑनलाईन व्यवहारांमध्ये जगात भारतीयांचे प्रमाण खूप जास्त आहे. परंतू ऑनलाईन व्यवहारांमध्ये किचकट पासवर्ड असायला हवा. याबाबतीत भारतीय हलगर्जीपणा करीत असल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन

व्यवहारांमध्ये भारतीयांचे प्रमाण अधिक असले तरी  डिजिटल सुरक्षेबाबत मात्र खुप मागासलेले आहेत. अनेक भारतीयांच्या ऑनलाईन खात्यांचे पासवर्ड अगदी काही सेकंदांमध्ये हॅकर्सच्या तावडीत सापडतात. 

जगात असे ठेवतात पासवर्ड

जगभरात अनेक इंटरनेट वापरकर्ते ऑनलाईन व्यवहारांच्या खात्यांचे पासवर्ड  स्वतःचे नाव पासवर्ड म्हणून वापरतात. तर लिव्हरपूल या फुटबॉल क्लबचे नावही खूप जणांनी पासवर्ड म्हणून वापरले आहे.

याशिवाय फेरारी आणि पोर्शे या काही लोकप्रिय कारची नावेही पासवर्ड म्हणून वापरली जातात. अशा शब्दांना स्वेअर वर्ल्ड असे म्हणतात. महिलांच्या तुलनेत पुरूषांकडून असे पासवर्ड ठेवले जातात.

आय लव्ह यु असा पासवर्ड अमेरिकेतील महिलांमध्ये जास्त ठेवत असल्याचे आढळून आले आहे.

नार्डपास या संस्थेने केलेल्या एका संशोधनात ही माहिती समोर आली आहे. जगभरात अनेकांनी अतिशय सोपे असे 123456, 111111, 654321 असे काही पासवर्ड वापरले आहेत. 

तर, भारतीयांमध्ये स्वतःचे नाव, जन्मतारिख, 12345, इंडिया 123, आय लव्ह यु, एबीसी 123, 123456789, अशा प्रकारच्या पासवर्डचा जास्त वापर होतो. त्यामुळे हॅकर्सचे पासवर्ड हॅक करण्यास फावते.

पासवर्ड कसा असावा?

सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय किचकट पासवर्ड ठेवायला हवा. त्यासाठी किमान 12 अक्षरी आणि इंग्रजी मोठी आणि लहान अक्षरे तसेच आकडे सिम्बॉलचा वापर करावा, असे सायबर तज्ज्ञ सांगतात. असे पासवर्ड हॅक करणे अवघड असते.