4G अपलोड स्पीडमध्ये 'आयडिया' अव्वल

रिलायन्स जिओने ग्राहकांना सगळ्यात स्वस्तात 4जी उपलब्ध करून दिल्यानंतर आता सार्‍याच टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये चुरसीची स्पर्धा सुरू झाली आहे. 

Updated: Oct 10, 2017, 08:55 AM IST
4G अपलोड स्पीडमध्ये 'आयडिया'  अव्वल  title=

मुंबई : रिलायन्स जिओने ग्राहकांना सगळ्यात स्वस्तात 4जी उपलब्ध करून दिल्यानंतर आता सार्‍याच टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये चुरसीची स्पर्धा सुरू झाली आहे. 

माय स्पीड अ‍ॅपच्या अहवालानुसार, सप्टेंबर महिन्यात आयडिया  4जी अपलोड स्पीड अव्वल होता. सप्टेंबर महिन्यात आयडियाचा अपलोड स्पीड हा ६.३०७ mbpsइतका होता. तर डाऊनलोड स्पीड हा ८.७४ mbps होता.

ट्राय साईटवरील माहितीनुसार आयडिया पाठोपाठ उत्तम 4 जी स्पीड देण्यामध्ये वोडाफोन, रिलायंस जिओ त्यापाठोपाठ एअरटेलचा नंबर लागतो.  मात्र डाऊनलोड स्पीडमध्ये मात्र आयडीया तिसर्‍या क्रमांकावर आहे. 

आयडीया सुमारे १.०५ लाख गावांपर्यंत पोहचले असून सुमारे देशभरात  ४५% लोकांपर्यंत सेवा पोहचवण्यात ते यशस्वी ठरले आहेत.