Hyundai ड्रायव्हरलेस RoboTaxi लवकरच बाजारात, याचे फीचर लगेच जाणून घ्या

हे सर्व इलेक्ट्रिक ह्युंदाई Ioniq 5 वर आधारित आहे, जे या वर्षाच्या सुरुवातीला सादर केले गेले होते.

Updated: Sep 4, 2021, 02:03 PM IST
Hyundai ड्रायव्हरलेस RoboTaxi लवकरच बाजारात, याचे फीचर लगेच जाणून घ्या title=

मुंबई : मोशनसह पार्टनरशिपमध्ये ह्युंदाईने पूर्णपणे स्वयंचलित Ioniq 5 Robotaxi संदर्भात खूलासा केला आहे. जे 2023 पासून सार्वजनिक वाहातूक आणि सेवेसाठी पूर्णपणे ड्रायव्हरलेस कार असेल. मोशनल ही ड्रायव्हरलेस टेक्निकल फर्म आहे जी बोस्टन, यूएसए येथे स्थित आहे आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये सुरू झाली आहे. Ioniq 5 मध्ये रोबोटॅक्सी लेव्हल 4 ऑटोमॅटिक टेक्नोलॉजीचा दावा करत आहे, जोपर्यंत ड्रायव्हर मॅन्युअल कंट्रोल घेत नाही तोपर्यंत ती कार सर्व परिस्थितींमध्ये ऑटो ड्राइव्ह करू शकते.

हे सर्व इलेक्ट्रिक ह्युंदाई Ioniq 5 वर आधारित आहे, जे या वर्षाच्या सुरुवातीला सादर केले गेले होते. कंपन्यांचे म्हणणे आहे की कारमध्ये 30 एक्सटरनल सेंसर आहेत, ज्यामध्ये कॅमेरा, रडार आणि लिडर बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे 360-डिग्री अजम्पशन आणि चालताना "अल्ट्रा-लाँग-रेंज" वर वस्तू शोधण्याची क्षमता प्रदान केली जाते.

मोशनल म्हणतात की, एक ऑपरेटर वाहनावर लांबून देखील नियंत्रण ठेवू शकतो आणि सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करू शकतो.मोशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्ल इग्नेम्मा म्हणाले, “ही रोबोटॅक्सी ड्रायव्हरविरहित कारचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्ग दाखवते.

Hyundai Motor Group आणि Aptiv सह आमच्या धोरणात्मक भागीदारीद्वारे, आम्ही आमच्या एकूण वाहन विकास प्रक्रियेत ऑटोमोटिव्ह आणि सॉफ्टवेअर कौशल्य अद्ययावत केले आहे. ही मदत आम्हाला रोबोटिक टॅक्सी विकसित करण्यास सक्षम करते. जी अत्यंत सुरक्षित, विश्वासार्ह आणि जागतिक उत्पादनासाठी किफायतशीर आहे.

आम्ही मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरणावर भर देत आहोत आणि Ioniq 5 रोबोटॅक्सी त्या हेतूने तयार केली गेली आहे.

Hyundai Ioniq 5 रोबोटॅक्सी लॉन्च मोशनल म्हणाले की, Ioniq 5 रोबोटॅक्सी 2023 मध्ये सेल्फ-ड्रायव्हिंग सेवा Lyft द्वारे प्रवाशांसोबत वाहतूक सुरू करेल, ज्याचा दावा लास वेगासमध्ये त्यांनी शेकडो हजारो स्वयंचलित वाहानांनी प्रवास केला आहे.

Hyundai Ioniq 5ने या वर्षाच्या सुरुवातीला 240 आणि 300 मैलांच्या रेंजसह 58kWh आणि 73kWh बॅटरी सादर केल्या. मोठ्या बॅटरी असलेले मॉडेल 220kW पर्यंत चार्ज करू शकतात, हे सेल्सला 18 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत भरतात.

पुढील आठवड्यातील म्युनिक मोटर शोमध्ये रोबोटॅक्सीचे अधिकृतपणे लोकांसमोर अनावरण केले जाईल, जिथे ह्युंदाईने वाहनाविषयी अधिक माहिती उघड करण्याचे आश्वासन दिले आहे.

 भारतात ह्युंदाई

भारतात परत, ह्युंदाईने अखेरीस i20 N लाईन लाँच करून भारतात मोस्टअवेटेड N परफॉर्मंस विभाग सुरू केला.