नवी दिल्ली : आयफोनला टक्कर देणारी हुवाई या चीनी मोबाईल कंपनीने त्यांचा एक जबरदस्त स्मार्टफोन बाजारात आणलाय.
हुवाईने त्यांचा चार कॅमेरे असलेला स्मार्टफोन ‘नोव्हा टू आय’ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नसली तरी फिचर्समुळे या फोनची चर्चा जोरात आहे.
‘नोव्हा टू आय’ हा स्मार्टफोन कंपनीने काळा, निळा व गोल्ड अशा तीन रंगात समोर आणला आहे. गेल्या महिन्यात लाँच झालेल्या हुवाईच्या मायमॅग सिक्सचे हे इंटरनॅशनल व्हेरिएंट आहे. या फोनमध्ये ५.९ इंची फुल एचडी स्क्रीन, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी दिली गेली आहे. फोनसाठी अॅंड्राईड नगेट ७.० वर आधारित ईएमयू आय ५.१ ओएस असून हा फोन फोर जी एलटीई सह अनेक कनेक्टिव्हीटी ऑप्शनला सपोर्ट करतो.
तसेच या फोनची खासियत कॅमेरा आहे. यात रियरमध्ये १६ व २ एमपीचे दोन कॅमेरे व्हर्टिकल सेटअपमध्ये दिले गेले आहेत. हे दोन्ही सेंसर पीडीएफ व ऑटो फोकस आहेत. सेल्फीसाठी फ्रंटला १३ व २ एमपीचे दोन कॅमेरे सेंसर, फिक्स फोकस लेन्स व फ्लॅशसह दिले गेले आहेत. रियर पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर असून त्याच्या सहाय्याने फोन अनलॉक करता येईल तसेच हा सेन्सर सेल्फी काढण्यासाठीही वापरता येणार आहे.