Jio TV घरच्या टीव्हीवर कसा पाहायचा? ही ट्रीक फॉलो करा आणि विना केबल कनेक्शन TV पाहा

या ऍपच्या मदतीने तुम्ही थेट टीव्ही पाहण्याचा आनंद घेऊ शकता. Jio ने ही सेवा अनेक वर्षांपूर्वी लाँच केली होती, जी आता Jio प्लॅटफॉर्मचा भाग आहे.

Updated: Mar 30, 2022, 03:34 PM IST
Jio TV घरच्या टीव्हीवर कसा पाहायचा? ही ट्रीक फॉलो करा आणि विना केबल कनेक्शन TV पाहा title=

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांकडे जिओचं कार्ड असले. यापूर्वी कंपनीच्या रिचार्जची वैधता 28 दिवसाची होती. परंतु आता कंपनीने ग्राहकांच्या मागणीनंतर ही मुदत वाढवून 30 दिवसांची केली आहे. तुम्हाला तर हे माहित असेल की, अनेक कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनसह असे अनेक सबस्क्रिप्शन प्लान्स देतात. ज्यामुळे युजर्स अनेक प्लॅटफॉर्मवर आपल्याला हव्या त्या गोष्टी पाहू शकतात. जिओ देखील आपल्या युजर्सला अनेक सबस्क्रिप्शन देतो. 

Jio TV ऍप्स हा पर्याय देखील आपल्याला जिओ देतो. या ऍपच्या मदतीने तुम्ही थेट टीव्ही पाहण्याचा आनंद घेऊ शकता. Jio ने ही सेवा अनेक वर्षांपूर्वी लाँच केली होती, जी आता Jio प्लॅटफॉर्मचा भाग आहे.

तुम्ही या ऍपवर थेट टीव्ही चॅनेल आणि ऑनलाइन व्हिडीओ पाहू शकता. या ऍपच्या मदतीने तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय तुमच्या फोनवर टीव्हीचा आनंद घेता येईल. जिओ आपल्या रिचार्ज प्लॅनसह ही सेवा मोफत देत आहे.

परंतु हे लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा टीव्हीवर Jio TV ऍप डाउनलोड करू शकत नाही. तुम्ही विविध प्लॅटफॉर्मवर Jio Cinema ऍप मिळवू शकता, तुम्हाला फक्त मोबाइलवर Jio TV अॅप  मिळेल.

परंतु असे अनेक मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही मोठ्या स्क्रीनवर 'या' ऍपचा आनंद घेऊ शकता. त्याची पद्धत जाणून घेऊया.

अशा प्रकारे Jio TV ऍप PC वर डाउनलोड केले जाईल
लॅपटॉप किंवा वैयक्तिक कंप्यूटरवर हा ऍप डाउनलोड करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एमुलेटर. तुम्हाला तुमच्या PC वर Bluestacks Android Emulator इन्स्टॉल करावा लागेल.

ते इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्हाला Google Play Store वर जावे लागेल, जिथे वापरकर्त्यांना त्यांच्या Google खात्याने लॉग इन करावे लागेल.

आता वापरकर्त्यांना JioTV ऍप शोधावे लागेल आणि नंतर ते डाउनलोड आणि इन्स्टॉल करावे लागेल. इंस्टॉलेशननंतर, वापरकर्त्यांना हे अॅप ब्लूस्टॅक्सच्या होम स्क्रीनवर दिसेल.

लक्षात घ्या की, हे ऍप वापरण्यासाठी तुम्हाला जिओ नंबरची आवश्यकता असेल. तुम्हाला तुमचा जिओ नंबर तेथे टाकावा लागेल आणि त्यावर ओटीपी टाकून पुष्टी करावी लागेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर या अॅपचा आनंद घेऊ शकता.

टीव्हीवर JioTV कसा पाहायचा

तुम्हाला तुमच्या टीव्हीवर Jio TV ऍप पाहायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला एक अतिशय सोपी पद्धत फॉलो करावी लागेल. वापरकर्त्यांना त्यांचा लॅपटॉप टीव्हीशी जोडावा लागेल. यासाठी वापरकर्ते HDMI केबल वापरू शकतात आणि मोठ्या स्क्रीनवर Jio TV चा आनंद घेऊ शकतात.

तथापि, यासाठी वापरकर्त्यांच्या लॅपटॉपमध्ये Jio TV ऍप असणे आवश्यक आहे, ज्यासाठी वापरकर्ते वर नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करू शकतात. HDMI केबल कनेक्ट केल्यानंतर युजर्सची लॅपटॉप स्क्रीन टीव्हीवर मिरर होईल.

टीव्ही आणि लॅपटॉप कनेक्ट केल्यानंतर, वापरकर्त्यांना टीव्ही रिमोटवरून HDMI मोड चालू करावा लागेल आणि त्यानंतर ते टीव्ही स्क्रीनवर Jio टीव्हीचा कन्टेन्ट पाहू शकाल.