गूगलच्या या अ‍ॅपने ७ भारतीय भाषांमध्ये करू शकाल ऑफलाईन भाषांतर

गूगलचे लहान लहान बदलही आपल्या आयुष्यातील अनेक मोठ्या गोष्टींमधील अडथळे दूर करायला मदत करत आहेत.

Updated: Sep 27, 2017, 09:29 AM IST
गूगलच्या या अ‍ॅपने ७ भारतीय भाषांमध्ये करू शकाल ऑफलाईन भाषांतर  title=

मुंबई : गूगलचे लहान लहान बदलही आपल्या आयुष्यातील अनेक मोठ्या गोष्टींमधील अडथळे दूर करायला मदत करत आहेत.

नुकतेच गूगलने ट्रान्सलेट अ‍ॅपमध्ये बदल केले आहेत. यामुळे आता गूगल ट्रान्सलेटचा वापर करून सात भारतीय भाषांमध्ये ऑफलाईन ट्रान्सलेशन करणेदेखील शक्य होणार आहे. 
गूगलने केलेल्या नव्या अपडेटनुसार कन्नड, गुजराती, मराठी,तमिळ, तेलगू आणि ऊर्दू मध्ये भाषांतर  करणं शक्य होणार आहे. ऑफलाईन ट्रान्सलेशनप्रमाणेच गूगलने बंगाली आणि तमिळ भाषेसाठी कन्व्हरसेशन ट्रान्सलेशनचाही पर्याय खुला केला आहे. 

कसा कराल कन्व्हरसेशन ट्रान्सलेशनचा वापर ? 
कन्व्हरसेशन मोडचा वापर करून दोन भाषांमध्ये बोलणं शक्य होईल. याकरिता माईक ऑन करून तुमची भाषा निवडा. आवाज ऐकून तुम्हांला अपेक्षित भाषेतील भाषांतर गूगलअ‍ॅप उपलब्ध करून देईल.  

वायफाय किंवा डेटा पॅकशिवायही मोबाईलमध्ये भाषांतर करणं सुकर होणार आहे. गूगलचे वर्ल्ड लेंस फीचर हा भाषांतराचा नवा अनुभव ठरणार आहे. प्रामुख्याने प्रवास करताना तुमच्या मनातील भावना व्यक्त करणार्‍यांसाठी हे अ‍ॅप नक्कीच फायद्याकहे ठरणार आहे.