मुंबई: गूगल हा आज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे.
किमान दिवासातून एकदा प्रत्येकजण गूगलची मदत घेतो.
आघाडीचं आणि लोकप्रिय सर्च इंजिन 'गूगल' आज आपला १९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त गूगलने एक खास डूडल आणि भेट आणली आहे.
आजच्या गूगल डूडलंची खास वैशिष्ट्य -
आज १९ वा वाढदिवस साजरा करणारे गूगल डूडल आपल्यासाठी १९ खास गिफ्ट्स घेऊन आला आहे. आज गूगलच्या होमपेजवर खास सर्च स्पीनर गूगल डूडल आहे. हे एका क्लिकने तुम्ही फिरवल्यास गेल्या १९ वर्षातील १९ खास गोष्टी तुम्हांला पहायला मिळतील. सोबतच यावर्षी नवीन स्नेक गेमही गूगलने आणला आहे.
गूगलची सेवा १६० देशांमध्ये, १२३ भाषांमध्ये उपलब्ध आहे. ४.५ कोटी लोकं नियमित गूगलचा वापर करतात.