Wi-Fi चा पासवर्ड विसरलात तर हा जुगाड नक्की करुन पाहा

 तुम्ही हा पासवर्ड कसा शोधून काढाल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Updated: Jul 16, 2021, 09:18 PM IST
Wi-Fi चा पासवर्ड विसरलात तर हा जुगाड नक्की करुन पाहा title=

मुंबई : आपण आजकाल इतक्या गोष्टींसाठी पासवर्ड ठेवतो की, आपण बऱ्याचदा हे विसरतो की, कोणत्या ठिकाणी आपण कोणता पासवर्ड ठेवला आहे. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला तो रिसेट करायला लागतो. त्यात असे काही ठिकाण असतात जेथे आपण फक्त एकदाच पासवर्ड वापरतो आणि नंतर तो विसरून जातो. त्यात Wi-Fi एक अशी गोष्ट आहे की, ज्याला एकदा कॉन्फिगर करताना आपण पासवर्ड ठेवतो आणि त्याला सगळ्या डिव्हाईसमध्ये टाकतोल मग विसरुन जातो.

परंतु जर एखादा मित्र किंवा नातेवाईक आपला घरी आला आणि त्यांनी Wi-Fi चा पासवर्ड विचारला तर तो आपल्या लक्षात येत नाही. (How To Recover Wi-Fi Password) किंवा जर आपण नवीन फोन विकत घेतल्यास त्यामध्ये Wi-Fiचा पासवर्ड देखील विचारला जातो, अशा वेळी मग आपण असे कोणते तरी जुणे कागदपत्र शोधण्याचा प्रयत्न करतो की, जेथे कदाचित आपण पासवर्ड लिहून ठेवला असावा.

त्यामुळे अशावेळी तुम्ही हा पासवर्ड कसा शोधून काढाल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आम्ही जो पर्याय सांगणार आहोत की, तो दुसऱ्या कोणाचा Wi-Fi नेटवर्क हॅक करण्यासाठी उपयुक्त नाही. हे बेकायदेशीर आहे आणि तुम्ही कदाचित यामुळे अडचणीत अडकू शकता. त्यामुळे केवळ तुमचा स्वतःचा Wi-Fi पासवर्ड मिळवण्यासाठी याचा वापर करा.

तुम्ही तुमचा वाय-फाय नेटवर्क पासवर्ड विसरला असल्यास, त्याला पुन्हा मिळवण्यासाठी खालील गोष्टींचे अनुकरण करा.

विंडोजवरील विसरलेला वाय-फाय पासवर्ड कसा मिळवावा?

लक्षात ठेवा ही, पद्धत तेव्हाच काम करते जेव्हा हा पासवर्ड ज्या सुरक्षित डिव्हाइसवर सेव्ह केला असेल त्यावरुन तुम्ही प्रयत्न करा. जर तुम्ही तुमचा लॅपटॉप एखाद्या एंटरप्राइझ नेटवर्कशी कनेक्ट केला असल्यास जसे की, आपल्या ऑफिस वाय-फाय तेव्हा या पद्धतीने पासवर्ड तुम्हाला मिळवता येणार नाही.

1. वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट असलेल्या पीसीमध्ये, स्टार्ट>कंट्रोल पैनल> नेटवर्क आणि शेअरींग केंद्रावर जा. विंडोज 8 कंप्यूटरवर, तुम्ही विंडोज की +C वर टॅप करा. त्यानंतर सर्चवर क्लिक करा आणि नेटवर्क आणि शेअर सेंटरवर शोधा.
2. डाव्या साइडबारवरील अ‍ॅडॉप्टर सेटिंग्ज चेंजवर क्लिक करा.
3. आपण वापरत असलेल्या Wi-Fi नेटवर्कवर राइट-क्लिक करा आणि Statusवर क्लिक करा.
4. वायरलेस प्रॉपर्टीवर क्लिक करा.
5. सुरक्षा टॅबवर क्लिक करा.
6. आता तुम्हाला Wi-Fi नेटवर्कचे नाव आणि हिडन पासवर्ड दिसेल. खाली दिलेल्या चेक कॅरॅक्टर्सवर क्लिक करताच पासवर्ड दिसेल.

मॅकवरील Wi-Fi पासवर्ड कसा मिळवू शकता?

1.  अ‍ॅप्लीकेशन / यूटिलिटीज वर जा.
2. कीचेन एक्सेस उघडा. वरती डावीकडील कीचेनच्या खाली सूचीबद्ध असलेल्या सिस्टम कीचेनवर जा.
3. वरच्या उजव्या कोपर्‍यातील शोध बॉक्समध्ये नेटवर्कचे नाव (एसएसआयडी) टाइप करून किंवा सूचीमध्ये ते मॅन्यूअली शोधून, तुम्ही ज्या Wi-Fiचा पासवर्ड शोधण्याचा प्रयत्न करत आहात, त्याला Wi-Fi नेटवर्क त्यामध्ये शोधा.
4. नेटवर्कच्या नावावर डबल क्लिक करा आणि नंतर बॉक्समध्ये संकेतशब्द दर्शवा पर्याय तपासा.
5. तुमचा यूझर अकाउंट पासवर्ड प्रविष्ट करा आणि नंतर तुम्हाला तुमचा Wi-Fi पासवर्ड दिसेल.