Google वर काय सर्च करता तुम्ही? सेकंदात करा डिलीट, कोणालाच समजणार नाही...

Google Search History: तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास सर्वप्रथम तुम्ही Google वर सर्च करतात. मात्र तुम्ही शोधलेली सर्व माहिती गुगल हिस्ट्रीमध्ये साठवलेली असते. तुम्हाला ही हिस्ट्री नको हवी असेल तर या सोप्या टिप्स फॉलो करा.... 

श्वेता चव्हाण | Updated: May 19, 2023, 04:32 PM IST
Google वर काय सर्च करता तुम्ही? सेकंदात करा डिलीट, कोणालाच समजणार नाही...  title=
google search history

Google Search History In Marathi : आपल्याला आयुष्यात अनेक प्रश्न पडतात. पण पूर्वेपेक्षा या प्रश्नांची उत्तरे शोधणे ही तेवढेच सोपे झाले आहे. कारण स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे सारे जग जवळ आले आहे. अनेकजण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यास थेट गुगल सर्च करतात. कारण गुगल प्रामुख्याने सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. माहितीचे भांडार असलेले गुगल दिवसभरात असंख्य गोष्टी सर्च करत असतो. कोणतीही माहिती हवी असल्यासस, प्रश्नांची उत्तरे हवी असल्यास आपण स्मार्टफोनवरुन त्वरित गुगलवर सर्च करत असतो. मात्र अनेकदा काही गोष्टी अशाही सर्च करतो, जे इतरांना समजू नये असे आपल्याला वाटत असते. 

चुकूनही आपला फोन कोणी हातात घेतल्यावर सर्त करु नये, अशी भीती आपल्या मनात असते. जर तुम्ही गुगलवर काय सर्च केले आहे, हे इतरांना समजू नये असे तुम्हाला वाटत असेल तर सोप्या टिप्सची मदत घेऊ शकता. या टिप्समुळ अगदी काही सेकंदात तुमची सर्च हिस्ट्री डिलीट करु शकता.

वाचा : कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व

जाणून घ्या सर्च हिस्ट्री कशी डिलीट कराल...

  • सर्वात आधी तुमच्या फोनवर Google Chrome ब्राउझर उघडा.
  • गुगल क्रोम ब्राउझरवर गेल्यावर उजव्या बाजूला तीन डॉट्स दिसतील, त्यावर टॅप करा.
  • तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध होतील.
  • येथे तुम्हाला History हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • हिस्ट्रीॉवर क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला Clear Browsing Data चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. 
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला आणखी दोन पर्याय दिसतील. यापैकी एक बेसिक आणि दुसरा अॅडव्हान्स असले. तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक पर्याय निवडून डेटावर क्लिक करा.
  • डेटावर क्लिक करण्यापूर्वी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे टाइम रेंज पर्याय निवडा. 
  • टाईम रेंजनुसार तुम्ही किती कालावधीमधील डेटा डिलीट करायचा आहे, ते निवडू शकता. 
  • यामध्ये तुम्हाला 1 तास, मागील 24 तास, मागील 7 दिवस,  आधीचे 4 आठवडे आणि संपूर्ण डेटाचे पर्याय दिसतील. तुम्ही येथून तुमचा संपूर्ण Google शोध इतिहास सहजपणे हटवू शकता. यामुळे तुमचा गुगल सर्च कोणालाच समजणार नाही.
  • तसेच, तुम्ही क्रोम ब्राउझरवर incognito मोड वापरू शकता. या मोडमध्ये, तुम्हाला तुमचा शोधलेला इतिहास दिसणार नाही.