How to clean your smartphone camera : आजच्या काळात मोबाईल माणसाची गरज झाली आहे. दिवसातील बरात वेळ आपण मोबाईलच्या सहवासात असतो. ऑफीसची कामे म्हणा किंवा पर्सनल यासाठी स्मार्टफोनला आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा भाग झाला आहे. मोबाईलशिवाय कोणतेही काम करू शकत नाही. याशिवाय कॉलिंग, गेम तसेच फोटोग्राफीसाठी आपण मोबाईलचा वापर करत असतो. तुम्ही जेव्हा मोबाईलचा अतिवापर करता तेव्हा इतर गॅजेटप्रमाणे मोबाईचीही तितकीच काळजी घेतली पाहिजे. अशावेळी आपण मोबाईलमध्ये असे भाग असतात जे तुम्हाला साफ करता येत नाही. मात्र तुम्ही तो भाग साफ करण्याच्या प्रयत्नात असं काही करुन बसता की त्याचा मोठा फटका बसू शकतो.
काही लोक त्यांच्या स्मार्टफोनचा डिस्प्ले कित्येक आठवडे साफ करत नाहीत. यामुळे सेल्फी लेन्सवर धुळ जमा होऊ लागते. काही वेळाने अस्वच्छता इतकी वाढते की सेल्फीही स्पष्ट दिसत नाही. जर तुम्हाला लेन्स स्वच्छ ठेवायचे असतील तर तुम्ही क्लिनिंग लिक्विडच्या मदतीने लेन्स पुसून टाकू शकता. यामुळे सेल्फीच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही.
अनेकवेळा लोकांच्या स्मार्टफोनचा डिस्प्ले खराब होतो, अशा परिस्थितीत पुन्हा डिस्प्ले बदलल्यानंतर कॅमेऱ्याच्या बाजूला कचरा-धूळ साचून राहते. म्हणूनच एकदा डिस्प्ले लावला की तो साफ करता येत नाही. अशा वेळी डिस्प्ले बसवताना दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीला त्याची आठवण करून द्यावी.
पावसात बर्याच वेळा तुम्ही स्मार्टफोन घेऊन बाहेर पडतात आणि नेमका तेव्हाच पाऊस पडतो. अशावेळी पावसाचे पाणी मोबाईलमध्ये जाते. अशावेळी तुम्हाला स्मार्टफोनची काळजी घेयाची असेल बाहेर पडताना झाकूनच बाहेर पडावे. या टिप्स फॉलो केल्यानंत तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा चांगल्या स्थितीत ठेवू शकता. याद्वारे क्लिक केलेल्या सेल्फीचा दर्जाही उत्कृष्ट असतो.
- मोबाईलचा कॅमेरा साफ करताना त्याच्या कोपऱ्यातील घाण काढण्यासाठी तुम्ही कोणत्याही तीक्ष्ण वस्तू वापरता. मात्र यावेळी तुमच्या कॅमेराची लेन्स खराब होऊ शकते.
- तुमच्या फोनमधील व्हॉल्यूम बटण आणि पॉवर बटणही साफ करण्याचा प्रयत्न करात असाल तर थांबा. सर्वात जास्त वापर असलेल्या या बटणांची योग्य निगा राखणं आवश्यक आहे. त्यामुळे ते साफ करताना योग्य काळजी घ्या.
- यानंतर येतो चार्जिंग पॉईंटचा भाग. जर चार्जिंग पॉईंटमधील घाण साफ करण्याच्या नादात तुम्ही काही जास्त टोकदार वस्तू वापरली तर नक्कीच नुकसान होऊ शकते.
- यासोबतच तुमच्या मोबाईलचा डिस्प्ले साफ तुम्ही करताना सर्रासपणे तुमच्या अंगावरील कपड्यांना तो पुसता. मात्र यामुळे डिस्प्ले खराब होऊ शकतो. त्यामुळे डिस्प्ले साफ कोणतेही कापड वापरू नका. साफ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरा. कारण या कपड्याने डिस्प्लेला कोणतेही नुकसान होत नाही.