Honda ची ही बाइक पेट्रोलच नाही तर 'या' इंधनावरही धावणार, अशी होईल पैशांची बचत

Honda Flex Fuel Motorcycles in india: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहून ग्राहकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. त्याचबरोबर इंधनाच्या इतर पर्यायांचा विचार देखील केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी टोयोटाने देशातील पहिल्या फ्लेक्स-फ्यूल इंजिन कार सादर केली होती. आता या तंत्रज्ञानावर आधारित बाइक बाजारात येणार आहे. 

Updated: Oct 20, 2022, 05:06 PM IST
Honda ची ही बाइक पेट्रोलच नाही तर 'या' इंधनावरही धावणार, अशी होईल पैशांची बचत title=

Honda Flex Fuel Motorcycles in india: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहून ग्राहकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. त्याचबरोबर इंधनाच्या इतर पर्यायांचा विचार देखील केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी टोयोटाने देशातील पहिल्या फ्लेक्स-फ्यूल इंजिन कार सादर केली होती. आता या तंत्रज्ञानावर आधारित बाइक बाजारात येणार आहे.  होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडियाने (HMSI) फ्लेक्स-इंधन इंजिन असलेली मोटरसायकल लाँच करण्याची तयारी केलीआहे. येत्या दोन वर्षात नवीन फ्लेक्स-इंधन मोटरसायकल लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. टीव्हीएसच्या फ्लेक्स-इंधन इंजिन Apache RTR 200 Fi E100 नंतर, फ्लेक्स-इंधन इंजिनवर चालणारी मोटरसायकल लाँच करणारी होंडा ही भारतातील दुसरी कंपनी असेल.होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्स इंडियाचे सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी दिल्लीतील जैवइंधनावरील आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान ही घोषणा केली. 

फ्लेक्स-इंधन इंजिनमुळे वाहन पेट्रोल आणि इथेनॉलवर चालण्यास सक्षम असते. ही बाइक गरजेनुसार पूर्णपणे पेट्रोल किंवा इथेनॉलवर धावू शकते. जापानी कंपनी होंडा  इतर देशांमध्ये फ्लेक्स-इंधन मोटरसायकल विकत आहे. कंपनी भारतात फ्लेक्स-इंधन इंजिनसह प्रवासी मोटरसायकल लाँच करू शकते.

Maruti च्या गाड्यांमध्ये मायलेज वाढवणारं जबरदस्त फीचर, तुम्हाला माहिती आहे का?

"फ्लेक्सी-इंधन मोटरसायकलचे पहिले मॉडेल 2024 च्या अखेरीस लाँच केले जाईल," असं सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी सांगितलं. पहिली फ्लेक्स-इंधन मोटरसायकल म्हणून कोणते मॉडेल वापरले जाईल याबाबत स्पष्टता नाही.