मुंबई : होंडा अॅक्टिवा 6G भारतात १२ जूनला लॉन्च होऊ शकते. होंडा टू व्हीलर्स इंडियाने १२ जूनला कंपनी एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करणार असल्याचं जाहीर केलं होतं. कंपनीने कोणतं प्रोडक्ट लॉन्च करणार याबाबत अजून माहिती दिलेली नाही. पण अॅक्टिवा 6जी लॉन्च होणार असल्याची चर्चा आहे. याआधी होंडाने CB300R आणि CBR650R बाईक लॉन्च केली. CB300R ची किंमत २.४१ लाख (एक्स-शोरूम) आणि CBR650R ची किंमत ७.७० लाख रुपये आहे.
होंडाच्या अॅक्टिवा गाडीची विक्री कमी झाली आहे. तर CB Shine ची विक्री देखील काही खास झाली नाही. त्यामुळे कंपनी ब्रँड न्यू जनरेशन अॅक्टिवा लॉन्च करु शकते. नवी अॅक्टिवा कधी लॉन्च होणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. होंडा अॅक्टिवा 6G मध्ये मॅकेनिकल आणि कॉस्मेटिक बदल असू शकतात.
नवी अॅक्टिवा 6G मध्ये अनेक बदल केल्याची माहिती आहे. कंपनीने फ्रंट साईट रिडिजाईन केली आहे. ग्राफिक्समध्ये देखील बदल आहे.
कंपनी मागच्या बाजुला बल्ब ऐवजी LED लाईट देऊ शकते. अंडर सीट स्टोरेजमध्ये LED लाईटसह मोबाईल चार्जिंगचा पोर्ट देखील दिला जावू शकतो. नव्या मॉडलमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स दिले जातील.