हीरो मोटोकॉर्पची नवी बाइक Xtreme 200 R, जाणून घ्या फिचर्स

24 मे रोजी होणार प्रदर्शित 

हीरो मोटोकॉर्पची नवी बाइक Xtreme 200 R, जाणून घ्या फिचर्स  title=

मुंबई :  Xtreme200 R ही हीरो मोटोकॉर्पची नवी बाइक 24 मे रोजी लाँच होणार आहे. लाँच होण्यापूर्वीच जाणून घ्या त्याचे फिचर्स. या बाइकला ऑटो एक्स्पो 2018 मध्ये पहिल्यांदा शोकेस केलं जाणार आहे. हीरो एक्स्ट्रीम 200 एस कॉन्सेप्टवर आधारित ही एक्सट्रीम 200 आर असणार आहे. 

5 गोष्टींचा केला खास विचार 

हीरोने दिलेल्या माहितीनुसार, या बाइकला बनवताना काही खास गोष्टींचा विचार केला गेला आहे. परफॉर्मन्स, ब्रेकिंग, साऊंड, एर्गोनॉमिक आणि हँडलिंग स्टेबिलिटी या 5 गोष्टींचा विचार केला गेला आहे. 

112 किलोमीटर प्रति तास स्पीड 

हीरोचा असा दावा आहे की, ही नवी बाइक 112 किमी प्रति तास स्पीड असणार आहे. यामुळे युवा पिढीला आवडणारी ही बाईक असेल यात शंका नाही. 

4.6 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास स्पीड 

0 ते 100 किमीचा प्रवास ही बाईक प्रति तासाला स्पीड असणार आहे. हीरो बाइकला हा रस्ता पार करण्यासाठी 4.6 सेकंद लागणार आहे. असा हीरोचा दावा आहे. 

200 सीसी, सिंगल सिलिंडरचे कॉर्ब्युरेटेड इंजिन 

या नव्या मोटरसायकलमध्ये हीरो मोटोकॉर्प 200 सीसी, सिंगल सिलेंडरचे कॉर्ब्युरेटेड इंजिन असणार आहे. हे इंजिन 8500 आरपीएमवर 18.1 बीएचपीचे पावर आणि 6,500 आरपीएमवर 17.1 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करत आहे. 

एक्स्ट्रीम 200 आर बाइकमध्ये बॅलेन्सर शिफ्ट 

हीरो मोटोकॉर्प एक्स्ट्रीम 200 आर बाइकवर बॅलेन्स शिफ्ट देण्यात आली आहे. याचा फायदा झटके कमी करण्याकरता होणार आहे. 

एलईडी पोजिशनिंग लॅम्प्स आणि एलईडी टेल लॅम्प 

हीरो Xtreme 200 R मध्ये एलईडी पोजिशनिंग लॅम्प आणि एक एलईडी टॅल लॅम्प देखील असणार आहे. यामध्ये 37 एमएम टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क आणि 8 स्टेप अजस्टबल मोनोशॉक दिला आहे. ब्रेकिंगसाठी यामध्ये 276 एमएम आणि मागे 220 एम एम डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. तसेच हीरो यामध्ये सिंगल चॅनल एबीएस देखील देणार आहे.