'कॉल रेकॉर्डिंग'चे सर्व App आजपासून बंद; तुमच्या फोनमध्ये आहेत का?

Google Play Store Policy मध्ये बदल झाल्यामुळे कॉल रेकॉर्डिंग App उद्यापासून काम करणार नाहीत Truecaller सह इतर Appचे वापरकर्ते त्यांच्या Android फोनवर कॉल रेकॉर्ड करू शकणार नाहीत.

Updated: May 11, 2022, 07:46 AM IST
'कॉल रेकॉर्डिंग'चे सर्व App आजपासून बंद; तुमच्या फोनमध्ये आहेत का? title=

मुंबई : Google Play Store Policy मध्ये बदल झाल्यामुळे कॉल रेकॉर्डिंग App उद्यापासून काम करणार नाहीत Truecaller सह इतर Appचे वापरकर्ते त्यांच्या Android फोनवर कॉल रेकॉर्ड करू शकणार नाहीत.

Google ची Play Store नियमावली आजपासून म्हणजेच 11 मे पासून बदलणार आहे. यामध्ये एक बदल म्हणजे अँड्रॉइडवरील कॉल रेकॉर्डिंग App बंद करणे. म्हणजेच, तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग Appसह Android स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्ड करू शकत नाही.

गुगलने म्हटले की, सुरक्षेमुळे कॉल रेकॉर्डिंग App बंद करण्यात येत आहेत. कॉल रेकॉर्डिंग App अनेक परवानग्या घेतात ज्याचा अनेक विकासक चुकीचा फायदा घेतात.

याशिवाय कॉल रेकॉर्डिंग Appबाबतचा कायदाही वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळा आहे. त्यामुळे कंपनी त्यात बदलही करत आहे. गुगलच्या नवीन नियमावलीमुळे आजपासून कॉल रेकॉर्डिंग App पूर्णपणे बंद होतील.

इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग App कार्यरत राहतील

परंतु, ज्या फोन्सना आधीच कॉल रेकॉर्डिंग फंक्शनॅलिटी देण्यात आली आहे ते काम करत राहतील. म्हणजेच तुमच्या फोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग App असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ते पूर्वीप्रमाणेच काम करत राहतील

या नियमावलीमुळे ज्यांच्या फोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग App नाही आणि ते इतर थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग Appद्वारे कॉल रेकॉर्ड करतात. त्यांना यापुढे कॉल रेकॉर्ड करता येणार नाही.