गूगलवर सर्वाधिक सर्च झालेला शब्द पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

 गूगलच्या सर्वाधिक सर्च महिलेच्या यादीत सनी लिओनी अव्वल होती. तर सर्वाधिक सर्च पुरुषाच्या यादीत सलमान खानचे नाव घोषित करण्यात आले होते.

Updated: Dec 13, 2018, 06:58 PM IST
 गूगलवर सर्वाधिक सर्च झालेला शब्द पाहून तुम्हीही थक्क व्हाल!  title=

भारत: दैनंदिन जीवनात असे खूप कमी प्रमाणात घडते की, आपण गूगलवर काही सर्च केले नाही. आपल्याला हवी असणारी माहिती गूगलच्या माध्यमातून मिळवली जाते. इंटरनेट आपल्यासाठी अतिशय गरजेचे साधन झाले आहे. त्यात गूगल आपली महत्त्वाची भूमिका बजावण्याचे काम करीत आहे. गूगल आपणास खूप कमी वेळात माहिती देण्याचेदेखील काम करतो. तसेच गूगलकडून आपण काय सर्च करतो या माहितीचा सर्व हिशोब ठेवला जातो

गूगलच्या सर्वाधिक सर्च झालेल्या महितीच्या यादीत सनी लिओनी अव्वल होती. तर सर्वाधिक सर्च पुरुषाच्या यादीत सलमान खानचे नाव घोषित करण्यात आले होते. त्याचप्रकारे गुगलने २०१८ मध्ये नेटकऱ्यांकडून कोणता शब्द सर्वाधिक सर्च केला आहे, याची माहिती दिली आहे. या वर्षी गूगलवर 'Good' हा सर्वाधिक सर्च झालेला शब्द ठरला आहे. 

गूगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला. त्यात २०१८ मधील काही Good गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. दरवर्षी गूगलकडून #YearInSearch या हॅशटॅगसहित वेगवेगळ्या विभागांमध्ये कोणत्या गोष्टी वर्षभरात नेटकऱ्यांनी सर्च केल्या, याबद्दलची माहिती दिली जाते.