Google मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तुमच्या स्मार्टफोनमधून गायब होणार 'हे' Apps

Google News : गुगलच्या नजरेत या अॅप्सना निगेटीव्ह रँकिंग. यापुढं ती डाऊनलोड करण्याचा विचारही करु नका. कारण? एकदा पाहाच का घेतला जातोय हा मोठा निर्मय. Techsavy मंडळींनी नक्की वाचा   

Updated: Mar 15, 2023, 10:20 AM IST
Google मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तुमच्या स्मार्टफोनमधून गायब होणार 'हे' Apps  title=
Google might remove Speed Booster apps from Play Store soon know the reason latest tech news

Google News : टेक (Tech News) जगतात येणारी प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक नव्या मॉडेलचा फोन खरेदी करण्याची प्रत्येकाचीच कुवत नसते. अनेकजण वर्षानुवर्षे एकच स्मार्टफोन वापरत आपली कामं पूर्ण करतानाही दिसतात. पण, नवे अपडेट या (Smartphones) स्मार्टफोन्सना सपोर्ट करत नसल्यामुळं युजर्सपुढे मोठी समस्याच उभी राहते. अनेकदा फोनची कार्यक्षमता कमी होते अशा वेळी मग अनेकजण आधार घेतात तो म्हणजे Third Party speed booster Apps चा. 

मुळात हे अॅप्स सुरुवातीला प्रचंड फायद्याचे ठरतात. आपल्या फोनची कार्यक्षमताही तुलनेनं वाढलेली असते. पण, त्याची दुसरी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? याच अॅप्सचे अनेक चुकीचे परिणामही तुमच्या स्मार्टफोनवर होत असतात. 

गुगलची कारवाई....

दरम्यान, आगामी Android 14 मध्ये मात्र असे अॅप्स सपोर्ट करणार नाहीत. गुगलच या अॅप्सविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. थोडक्यात गुगलकडून या Speed Booster अॅप्सविरोधात पावलं उचलली जाऊ शकतात. KILL BACKGROUND PROCESSES च्या नावाखाली स्मार्टफोनमधील डेटा नष्ट करणाऱ्या या अॅप्सना Android 14 मध्ये स्थान मिळणार नाहीये. 

OS चं स्वत:चं टास्क मॅनेजमेंट असतं. ज्यामुळं ही सिस्टीमच मोबाईलमधील मेमरी मॅनेज करण्यासाठी मदत करते. परिणामी वेगळे स्पीड बूस्टर वापरण्याचा सल्ला केव्हाच दिला जात नाही. त्यामुळं आता सर्वाधिक वापरात असणारी ही स्पीड बूस्टर अॅप्स नसल्यामुळं तुम्ही नेमका तुमच्या फोनचा स्पीड कसा कायम ठेवाल? यासाठीही काही Tricks आहेत... 

वापरात नसणारे अॅप्स बंद करा 
एकाच वेळी अनेक अॅप्स सुरु ठेवल्यामुळं फोन Slow काम करु लागतो. त्यामुळं काम होताच ते अॅप बंद करण्याची सवय ठेवा. 

हेसुद्धा वाचा : Maruti Brezza SUV : अवघ्या 3 लाखात घरी आणा ब्रेझा; सर्वाधिक विक्री होणारी कार घ्यायची घाई करा

 

मोबाईल अपडेट ठेवा 
जेव्हाजेव्हा सिस्टीम अपडेट येईल तेव्हातेव्हा फोन अपडेट ठेवा. ज्यामुळं त्याची कार्यक्षमता टीकून राहील. 

Lite अॅप्स वापरा 
अनेक लोकप्रिय अॅप्सचे Lite वर्जनही आहेत. त्यामुळं तेच वर्जन वापरण्याचा सल्ला दिला जातो. 

cache नियमित क्लिअर करा 
cache डेटामुळं मोबाईल अनेकदा बंद होतो किंवा व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळं cache नियमित क्लिअर करा. 

वापरात नसणारे Apps डिलीट करा 
सहसा एकदा दोनदा वापर केल्यानंतर अनेक अॅप्स आपण पुन्हा कधीच वापरत नाही. असे सर्व अॅप्स फोनमधून काढून टाका.