मुंबई : रिलायन्स कंपनी आपला जिओ फोन १५०० रुपयांना विकत आहे. पण कंपनीला यासाठी २,५०० खर्च येत आहे. याच्याशी संबधित सूत्रांनी रॉयटर्सला ही माहिती दिली आहे. याचा अर्थ कंपनीला १ कोटी फोनसाठी ९८१ कोटी रूपये खर्च करावे लागतील. २५०० हजार किंमतीचा फोन एवढ्या कमी किंमतीत का देत आहे असा प्रश्न पडतो. आपण जाणून घेऊया यासंबंधी काही माहिती.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक वाढविणे हे कंपनीचे मुख्य लक्ष आहे. पुढच्या दोन वर्षात कंपनीला २५ ते ३० कोटी यूजर्स जोडायचे आहेत. पण कंपनीतर्फे याबबत खुलेपणाने सांगण्यात आले नाही. सूत्रांनी सांगितले की २५०० एवढी किंमत ठेवून हे शक्य झाले नसते. त्यामूळे रिलायन्सने हे धाडसी पाऊल उचलले आहे.
कंपनीला जिओफोन विक्रीतून प्रत्येक ग्राहकाकडून मिळणारा फायदा हा ५० रुपयांपेक्षाही कमी आहे. पण १५३ रुपया सारख्या मासिक प्लॅनच्या माध्यमातून ही किंमत कंपनी मिळवू शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे. फ्रि वॉईस कॉल आणि कमी किंमतीत डेटा देत कंपनीने आतापर्यंत १२.८ कोटी ग्राहक जोडले आहेत.