मुंबई : रिलायन्स जियोने आपल्या युजर्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. कंपनी पोस्टपेड आणि जियोफाई डिवाईसवर कॅशबॅक देतेयं. नव्या ऑफरनुसार, कंपनीतर्फे जियो पोस्टपेड सिमसोबत JioFi डिवाईसच्या खरेदीवर ५०० रुपयांचे कॅशबॅक देण्यात येतंय. ग्राहकांनी सर्वकाही टर्म्स आणि कंडीशननुसार केल्यास त्यांच्या अकाऊंटमध्ये ५०० रुपये क्रेडीट करण्यात येतील. या ऑफरनुसार जियोफाई हॉटस्पॉट ग्राहकांना साधारण ५०० रुपयांपर्यंत मिळेल. ही ऑफर ९९९ रुपयांच्या जियोफाई हॉटस्पॉट डिव्हाईसवर मिळेलं.
१,९९९ रुपयांच्या वेरिएंटवर ही ऑफर उपलब्ध नाही. ५०० रुपयांचा कॅशबॅक मिळविण्यासाठी युजर्सना १२ महिन्यांपर्यत आपलं पोस्टपेड बिल जमा करावं लागणार आहे. यानंतर ५०० रुपयांचे कॅशबॅक क्रेडीट रुपात मिळेल. याचा उपयोग पुढची पोस्टपेड बील जमा करण्यासाठी होऊ शकतो. सध्या जियो १९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान देतंय पण लवकरच इतर प्लान जारी केला जाईल.
देशातली सगळ्यात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलनं ग्राहकांना झटका दिला आहे. एअरटेलनं त्यांच्या १४९ आणि ३९९ रुपयांच्या प्लानच्या इंटरनेट डेटामध्ये कपात केली आहे. एअरटेलच्या १४९ रुपयांच्या प्लानमध्ये आता २८ दिवसांसाठी १ जीबी डेटा प्रत्येक दिवशी देण्यात येणार आहे. तर ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसांसाठी १.४ जीबी डेटा प्रत्येक दिवशी देण्यात येईल. अनलिमिटेड कॉल आणि दिवसाला १०० एसएमएसची सुविधा अजूनही कायम आहे.