Google Pay FD : Google आपले डिजिटल पेमेंट अॅप Google Pay मध्ये नवीन नवीन फीचर आणत आहे. माउंटन व्ह्यू जायंटने Google Pay युजर्ससाठी FD सुविधा देण्यासाठी छोट्या वित्त बँकेशी भागीदारी केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला स्वतंत्र बँक खाते उघडण्याची गरज पडणार नाही. थेट Google Pay अॅपवरून तुम्ही FD करू शकता.
एफडीवर 6.35% व्याज दर
पहिली डिजिटल FD सेवा नुकतीच देशात लॉन्च करण्यात आली. गुगलने चेन्नई स्थित इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेसोबत भागीदारी केली आहे. जेणेकरून बँक खाते नसलेल्या युजर्सला एफडीचा लाभ मिळेल. म्हणून, इच्छुक वापरकर्ते आता Google Pay वर FD उघडू शकतात आणि वार्षिक 6.35% व्याज दर मिळवू शकतात (Google Pay FD Interest Rate).
इक्विटास एसएफबीचे म्हणणे आहे की, फिनटेक इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन सेतूने विकसित केलेल्या एपीआयचा फायदा घेऊन ते डिजिटल एफडी सेवा देत आहे. त्यामुळे आता Google सह भागीदारी करून, बँक Google Pay अॅपद्वारे देशभरात सेवा प्रदान करू शकेल.
Google Pay वर FD कसे उघडावी.
Google Pay वर FD सुरु करण्यासाठी, तुम्हाला App वर "Business & Bills" विभागात इक्विटास स्मॉल फायनान्स बँक शोधावी लागेल. पुढे, तुम्हाला तुमचे KYC तपशील देणे आणि तुमच्या FD चे पेमेंट Google Pay UPI वापरून पूर्ण करणे आवश्यक आहे.
एकदा तुम्ही FD उघडल्यानंतर तुम्ही ते थेट Google Pay अॅपवर ट्रॅक करू शकाल. तसेच, तुम्ही पेमेंट अॅप वापरून अधिक FD उघडता तेव्हा ते ट्रॅकिंग पेदवर दिसू लागेल. मॅच्यूअर झाल्यावर, ही रक्कम आपोआप Google Pay वापरकर्त्यांच्या विद्यमान Google Pay लिंक केलेल्या बँक खात्यात जाईल," इक्विटास SFB ने एका निवेदनात हे म्हटले आहे.
या व्यतिरिक्त, आपण ट्रॅकिंग पेजवरून आधीच FD बंद करण्याची मागणी देखील करू शकता. त्या बाबतीत, इक्विटास एसएफबी म्हणते की,'युजर्सला विनंतीच्या त्याच दिवशी त्यांच्या लिंक केलेल्या बँक खात्यात रक्कम प्राप्त होईल.'