'फ्रिडम २५१' फोनचं स्वप्न दाखवणारा मोहित गोयल पोलिसांच्या ताब्यात

हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Updated: Jun 11, 2018, 08:10 PM IST
'फ्रिडम २५१' फोनचं स्वप्न दाखवणारा मोहित गोयल पोलिसांच्या ताब्यात title=

मुंबई : Freedom 251 या फोनच्या बातम्यांनी सर्वांना अक्षरश: वेड लावल होतं. लॉंच होण्याआधीच या फोनची जगभराच चर्चा सुरू झाली होती. पण आता या फोनचं स्वप्न दाखविणाऱ्या मोहित गोयलला पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यासहित अन्य दोघांना नोएडा कंपनीच्या रिंगिंग बेल्स येथून ताब्यात घेण्यात आलंय. ६ मार्चला राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील ५ व्यापाऱ्यांनी गॅंगरेप केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. हॉटेल इव्हेंटच्या बहाण्याने बोलावून ५ जणांनी रेप केल्याचे तिचे म्हणणे होते. पोलिसांनी यानंतर पाचही जणांना ताब्यात घेतलं. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे नॉर्थ वेस्टच्या डीसीपींनी सांगितलं.

प्रकरण दाबलं

मोहित व्यतिरिक्त इतर आरोपिंची नावे त्याला पकडल्यानंतर समोर येतील असे महिलेने म्हटले आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नेताजी सुभाष पॅलेस पोलीस स्थानकात देण्यात आली होती. हे प्रकरण दाबण्यासाठी ५ कोटी रुपयांचा व्यवहार होत होता. यावेळीच पोलिसांनी आरोपींना अटक केल्याचे म्हटले जात आहे.  हे प्रकरण दडपण्यामध्ये मोहित गोयलही सहभागी असल्याचे म्हटले जात आहे.