मुंबई : Amazon Prime Day Sale ला टक्कर देण्यासाठी ई-कॉमर्स कंपनी Flipkart ने देखील कंबर कसली आहे. कंपनीने 16 जुलै ते 19 जुलैपर्यंत Big Shopping Days नावाने सेल आयोजित केला आहे. या सेलमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमधल्या वस्तूंवर सूट मिळणार आहे. ज्यामध्य़े मोबाइल फोन, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा ही समावेश आहे. कंपनीने सेल हो तो ऐसी असं या ऑफरला टॅगलाईन दिली आहे. Amazon चा महासेल 36 तास चालणार आहे तर Flipkart चा सेल 80 तास चालणार आहे.
Amazonला टक्कर देण्यासाठी Flipkart ने स्टेट बँक ऑफ इंडियासोबत करार केला आहे. SBIच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना 10% इंस्टेंट डिस्काउंट दिला जाणार आहे. याशिवाय Flipkart आपल्या ग्राहकांना नो-कॉस्ट EMI चं ऑप्शन देखील देत आहे.
Flipkart ने 1500 हून अधिक स्मार्टफोन मॉडल्सवर सूट जाहीर केली आहे. या सेलमध्ये Google पिक्सल 2 (128जीबी) तुम्हाला 42,999 रुपयांना मिळणार आहे. गूगल पिक्सल 2 वर तुम्हाला 37,000 रुपयेपर्यंत बायबॅक गॅरंटीसह 3,000 रुपयांची एक्सचेंज आणि 8,000 रुपयांची कॅशबॅक ऑफर देखील मिळणार आहे.
स्मार्टफोन आणि इतर अक्सेसरीजवर कंपनी एक्सचेंज डिल्स आणि बायबॅक गॅरंटी देखील देत आहे. इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवर 80 टक्के सूटची ऑफर देण्यात येणार आहे. याशिवाय होम अप्लायंस आणि टीव्हीवर 70 टक्के डिस्काउंट दिलं जाणार आहे.
या सेलमध्ये Flipkart ने अनेक डिल्स ठेवल्या आहेत. ज्याचा फायदा वेगवेगळ्या वेळी तुम्ही घेऊ शकता. जशी 'ब्लॉकबस्टर डील' जी प्रत्येक 8 तासानंतर रिफ्रेश होईल. 'प्राईस क्रॅश डील' जी प्रत्येक 8 तासानंतर रिफ्रेश होईल. 'रश हवर डील' जी फक्त 2 तासासाठी असणार आहे. संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत ही चालेल आणि 'फर्स्ट टाईम ऑन डिस्काउंट' ही डील देखील असणार आहे.
अॅमेझॉनची ऑफर देखील 16 जुलैला सुरु होणार आहे. 16 ते 18 जुलैपर्यंत 36 तासांची ही ऑफर असणार आहे. अॅमेझॉन प्राईम युजर्सला याचा फायदा मिळणार आहे.