मुंबई : Apple ने गेल्या वर्षी आयफोन 13 सीरीज लाँच केली होती. लॉन्च होताच लोकांमध्ये त्याला जबरदस्त पसंती मिळाली. फोनची विक्रमी विक्री झाली. iPhone 13 79,900 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. मात्र ई-कॉमर्स प्लटफॉर्मवर त्याची किंमत कमी झाल्याचे दिसून येत आहे. iPhone 13 128GB स्टोरेज व्हेरिएंट Flipkart आणि Amazon वर 74,900 रुपयांना उपलब्ध आहे. पण Flipkart वर iPhone 13 वर जास्त डिस्काऊंट मिळत आहे.
जर तुम्ही iPhone 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी असू शकते. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन, आयफोन 13 अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.
iPhone 13 128GB स्टोरेज वेरिएंटची लॉन्चिंग किंमत 79,900 रुपये आहे, परंतु हा फोन फ्लिपकार्टवर 74,900 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर 5 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. त्यासोबतच एक बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. ज्यामुळे फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होते.
iPhone 13 वर 10 टक्के झटपट कॅशबॅक उपलब्ध आहे. तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm, SBI Pay, BHIM UPI, FreeCharge, Axis Pay, Samsung Pay किंवा MobiKwik द्वारे UPI पेमेंट केल्यास तुम्हाला हजार रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच फोन 73,900 हजार रुपयांत उपलब्ध होईल. त्यानंतर एक्सचेंज ऑफर देखील आहे.
iPhone 13 वर 18,500 रुपयांची एक्सचेंज ऑफ आहे. जर तुम्ही जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते.
परंतु तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीन असेल तरच रु. 18,500 ची सूट मिळेल. अशा सर्व सुविधा वापरून आयफोन 13 तुम्हाला 55 हजार 400 रुपयांपर्यंत मिळू शकतो.