अॅपल आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस मिळतोय इतका स्वस्त

फ्लिपकार्ट बिग बिलीअरीज डेज सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफरही अमेझॉनवर मिळत आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 22, 2017, 01:32 PM IST
अॅपल आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस मिळतोय इतका स्वस्त title=

नवी दिल्ली: प्राइम मेंबर्ससाठी एक दिवस आधी सेल सुरु केल्यानंतर अमेझॉनने आपला ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल इतरांसाठीही खुला केला आहे.

या सेलमध्ये प्रत्येक प्रोडक्टवर खास ऑफर आहे. विशेष गोष्ट अशी आहे की फ्लिपकार्ट बिग बिलीअरीज डेज सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफरही अमेझॉनवर मिळत आहे.  आपण यातील अॅपलच्या आयफोनविषयी माहिती घेवू..

अॅपल आयफोन ७

फ्लिपकार्ट प्रमाणेच, आयफोन ७ मध्ये ३२ जीबी व्हेरिएंट ग्राहकांना स्वस्त दराने ऑफर केले जात आहेत. 
आयफोन ७ चे ३२ जीबी व्हर्जन हे ग्राहकांसाठी ३८,९९९ रुपये (एमआरपी ५६,२००) वर उपलब्ध आहे. १२८ जीबी रुपयांचे रु.६५,२०० फक्त ४९,९९९ रुपयांना मिळत आहे. 
ही आयफोन ७ ची सर्वात कमी किंमत आहे.
आयफोन ७ मध्ये एक ४.७ इंच रेटिना एचडी डिस्प्ले आहे.
याला १२ मेगापिक्सेल प्रायमरी आणि ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून ग्राहकांच्या खूप पसंतीस पडत आहे.

अॅपल आयफोन ७ प्लस 

आयफोन ७ प्लसची १२८ जीबी व्हरिएंट सेलमध्ये ग्राहकांना ५९,९९९ रु. (एमआरपी ७६,३००) मिळत आहे. ही आयफोन ७ची आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आहे.
जर तुम्ही यावर्षी लॉंच झालेल्या आयफोन ८ किंवा आयफोन ८ प्लसच्या शोधात आहात तर ही एक चांगली डील आहे.
आयफोन ७ प्लसमध्ये ५.५ इंच रेटिना डिस्प्ले आहे. हे १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ७ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.