तुम्हाला Smartphone घ्यायचा आहे? 20 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 5 मोबाईल

Smartphones under 20000: मोबाईल मार्केट गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलं आहे. अनेक कंपन्यांनी आपले स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. पण स्वस्त फोनमध्ये महत्त्वाचे फीचर्स नसतात, अशी काही जणांची समज आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोनची माहिती देणार आहोत, ज्याची किंमत 20 हजार रुपयांच्या खाली असून दमदार फीचर्स आहेत.

Updated: Dec 9, 2022, 02:24 PM IST
तुम्हाला Smartphone घ्यायचा आहे? 20 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 5 मोबाईल title=

Smartphones under 20000: मोबाईल मार्केट गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलं आहे. अनेक कंपन्यांनी आपले स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. पण स्वस्त फोनमध्ये महत्त्वाचे फीचर्स नसतात, अशी काही जणांची समज आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोनची माहिती देणार आहोत, ज्याची किंमत 20 हजार रुपयांच्या खाली असून दमदार फीचर्स आहेत. तसेच रफ अँड टफ यूज करू शकता. या सेगमेंटमध्ये 5G फोनही आहेत. तसेच जबरदस्त बॅटरी, कॅमेरा सेटअप आणि परफॉर्मेंसमुळे स्मार्टफोनची चर्चा आहे. या स्मार्टफोनच्या यादीत OPPO, POCO, Realme या सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. 

OPPO F21 Pro: जर तुम्ही कमी किमतीत चांगला कॅमेरा आणि बॅटरी असलेला स्मार्टफोन शोधत असाल तर OPPO F21 Pro तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 64MP आणि 2MP चे दोन लेन्स उपलब्ध आहेत आणि सेल्फीसाठी 32MP कॅमेरा देखील उपलब्ध असेल. फोनमध्ये 6.43-इंचाचा डिस्प्ले उपलब्ध आहे. हा फोन फ्लिपकार्टवर 19,990 रुपयांना उपलब्ध आहे.

Poco X4 Pro 5G: फोनमध्ये 6.67-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले मिळेल. याशिवाय, फोन स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेटद्वारे समर्थित आहे. डिस्काउंटसह, फोन फ्लिपकार्टवर 15,999 रुपयांना उपलब्ध आहे.

Realme 9 5G: फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे आणि फोन Mediatek Dimensity 810 द्वारे समर्थित आहे. Flipkart वर 64GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे.

Motorola G62 5G: फोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्राथमिक सेन्सर 50MP चा आहे. फोनमध्ये 5000mAh ची मजबूत बॅटरी उपलब्ध आहे. या फोनची किंमत 16 हजार रुपये आहे. 

बातमी वाचा- Knowledge News: स्मार्टफोनमध्ये 3 कॅमेऱ्यांची खरंच गरज असते? जाणून घ्या यामागचं कारण

Redmi Note 11 Pro: 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा स्मार्टफोन सर्वोत्तम मानला जातो. यामध्ये तुम्हाला 108MP कॅमेरा आणि 6.6-इंचाचा डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120HZ आहे. फोन 67W टर्बोचार्जिंगद्वारे पटकन चार्ज होईल. 128GB वेरिएंटची किंमत फक्त 17,999 रुपये आहे.