अमर काणे, झी मीडिया, नागपूर : बातमी आहे व्हायरल मेसेजची. मोबाईलच्या निळ्या लाईट्समुळे वेळेआधीच तुम्ही वयोवृद्ध होऊ शकता असा दावा करण्यात आलाय. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol mobile blue light will affect on your screen and eyes)
दावा आहे की, मोबाईलच्या लाईट्समुळे तुम्ही लवकर म्हातारे व्हाल. मोबाईलच्या प्रकाशामुळे चेहऱ्यावरील त्वचेवर परिणाम होऊ शकतो. तसेच त्वचारोग झाल्याने तुम्ही वृद्ध दिसाल. नजरेवरही परिणाम जाणवतो. असा दावा करण्यात आल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली.
मोबाईल प्रत्येक जण वापरत असल्याने याचं सत्य जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर काणे तज्ज्ञांना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि या दाव्याबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
मोबाईलच्या निळ्या लाईटचा डोळ्यांवर, त्वचेवर परिणाम होत नाही. मोबाईलच्या निळ्या लाईटमुळे झोपेवर परिणाम होतो. निळी लाईट आणि अल्ट्राव्हायोलेट लाईटमध्ये फरक आहे. अल्ट्राव्हायोलेट लाईटमुळे डोळ्यांचे आजार, त्वचेची समस्या जाणवते.
मोबाईलचा अतिवापर हा घातकच आहे. पण मोबाईलच्या लाईटने त्वचेची समस्या जाणवून वेळेआधीच वयोवृद्ध व्हाल हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला.