तुम्ही देखील Online Payment करत असाल, तर ही माहिती जाणून घ्या

RBI चा हा नवा नियम 1 जुलै 2022 पासून देशभर लागू होणार आहे.

Updated: Jun 8, 2022, 08:47 PM IST
तुम्ही देखील Online Payment करत असाल, तर ही माहिती जाणून घ्या title=

मुंबई : तुम्हीही ऑनलाइन पेमेंट करत असाल, तर तुम्हाला फसवणूकीपासून वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक उपाय आणला आहे. जेणे करुन तुमची फसवणूक होणार नाही. हा  नवीन नियम१ जुलैपासून लागू होत आहे. चला तर मग जाणून घेऊया RBI चा हा खास नियम, जो तुम्हाला सुरक्षित ठेवेल. तुम्ही ऑनलाइन पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरबीआयच्या वतीने व्यापारी वेबसाइटवर ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी कार्ड टोकन करण्याचा आदेश जारी केला आहे. ज्यामुळे तुमच्या कार्डची माहिती कोणत्याही वेबसाईटवर किंवा ऍपवर सेव्ह होणार नाही.

सध्या जेव्हा आपण ऑनलाईन साईटवरुन एखादी वस्तू खरेदी करतो, तेव्हा आपल्या कार्डची माहिती तपशील तेथे टाकतो आणि आपली कार्ड डिटेल तेथे सेव्ह केली जाते. परंतु आता आरबीआयने 30 जून 2022 पूर्वी संचयित केलेला संपूर्ण डेटा हटविण्याचे निर्देश दिले आहेत.

RBI चा हा नवा नियम 1 जुलै 2022 पासून देशभर लागू होणार आहे. म्हणजे जर तुम्ही ईकॉमर्स पोर्टलवर खरेदी करत असाल, तर तुम्हाला कार्ड टोकनाइज्ड मिळणे आवश्यक आहे.

टोकनायझेशन म्हणजे क्रेडिट आणि डेबिट कार्डचे तपशील टोकन नावाच्या पर्यायी कोडसह बदलणे. म्हणजे तुमच्या बँकेची माहिती कोणालाही मिळणार नाही.

त्यामुळे आता ऑनलाइन व्यापाऱ्यांना त्यांच्या ग्राहकांची कार्ड त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सेव्ह करता येणार नाही, त्याबदल्यात टोकन क्रमांक वापरले जातील.

टोकनायझेशनचे फायदे
यामुळे माहितीची देवाणघेवाण तसेच फसवणूक टाळता येते.

फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी, आरबीआयने व्यापाऱ्यांना ऑनलाइन पेमेंटसाठी विशेष कोड संग्रहित करण्याचे निर्देश दिले आहेत, जो तुमचा मूळ कार्ड क्रमांक नसेल.

फोन पे मनी ट्रान्सफर
एक टोकन फक्त एका कार्डसाठी आणि एका व्यापाऱ्यासाठी वैध आहे. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड एका ई-कॉमर्स साइटसाठी टोकनाइज केल्यास, त्याच कार्डावर दुसऱ्या साइटवर वेगळे टोकन असेल, सरकारचा हा नियम फसवणूक टाळण्यासाठी आहे.

व्यवहार करण्यासाठी तुम्ही कोणत्याही कार्डवर टोकनची विनंती करू शकता. कार्ड टोकन करण्यासाठी कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही. ते पूर्णपणे मोफत असेल.