Facebook मध्ये व्हिडिओ शोधण झालं आणखी सोपं

फेसबुकवर अनेक व्हिडीओ युजर्सचे मनोरंजन करतात

Updated: Oct 20, 2020, 03:37 PM IST
Facebook मध्ये व्हिडिओ शोधण झालं आणखी सोपं title=

नवी दिल्ली : फेसबुकवरुन दररोज लाखो व्हिडिओ डाऊनलोड होतात. तुम्हाला फेसबुक टाईमलाईनवर देखील अनेक व्हिडिओ दिसत असतील. एखादा व्हिडिओ आपल्याला आवडतो आणि पुन्हा पाहावासा वाटतो. पण वारंवार सर्च करुनही तो सापडत नाही. यासाठी फेसबुकने उपाय शोधलाय. या प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला १२५ कोटी युजर्स येतात आणि प्रत्येक व्हिडीओचा आनंद घेतात. टीव्ही शोज, स्पोर्ट्स, बातम्या, म्यूझिक व्हिडिओ, लाईव्ह इव्हेंट असे अनेक व्हिडीओ युजर्सचे मनोरंजन करत असतात. 

तुम्ही तुमच्या आवडलेल्या व्हिडीओचे पेज किंवा प्रोफाइल लाईक करता तसं आवडता विषय देखील लाईक करु शकता असं फेसबुकने म्हटलंय. टॉपिक्सच्या मदतीने तुम्ही फीडमध्ये दिसणाऱ्या व्हिडिओचे खासगीकरण करु शकता. याचा अर्थ तुम्हाला जे पाहीजेय तेच फीडमध्ये दिसेल. 

अमेरिकेत या फिचर्सची सुरुवात होणार आहे. यामध्ये तुम्ही तुमचे आवडते पेज शोधू शकाल आणि फॉलो देखील करु शकाल. अमेरिकेसहीत काही अन्य ठिकाणी यूजर्सला व्हॉट्स हॅपनिंग आणि फिचर्ड सारखे सेक्शन दिसू शकतील. 

या गटातील व्हिडिओची निवड फेसबुकद्वारे केली जाईल. त्यामुळे ताजा घडामोडींचा तुम्ही आनंद घेऊ शकता. टेलिव्हिजन अकादमी एन्युअल एम्मी एवॉर्ड्स किंवा एमएमलबी वर्ल्ड सीरीज हायलाईट पाहू शकता.