आता चंद्रावर 4G : NASA ने दिलं Nokia ला कॉन्ट्रॅक्ट

NASA ची सर्वात मोठी भूमिका

Updated: Oct 19, 2020, 08:47 PM IST
आता चंद्रावर 4G : NASA ने दिलं Nokia ला कॉन्ट्रॅक्ट  title=

मुंबई : अमेरिकेतील स्पेस एजन्सी NASA आणि NOKIA मिळून आता चंद्रावर 4G LTE कनेक्टिविटी पोहोचवणार आहे. NASA ने असं जाहिर केलं आहे की, चंद्रावर सर्वात अगोदर सेल्यूलर कनेक्टिविटीकरता Nokia ला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे. 

Nokia ने एका स्टेटमेंटमध्ये म्हटलंय की, LTE/4G टेक विश्वसनीय आणि हाय डेटा रेट्स देऊन चंद्राच्या पृष्ठावर क्रांती घडवण्याचा मानस आहे. NASA Artemin Program च्या अंतर्गत २०२४ पर्यंत चंद्रावर मॅन्ड मिशन पाठवण्याच्या तयारीत आहे. नोकियाने म्हटलंय की NASA Artemin च्या दरम्यान कम्युनिकेशन सर्वात मोठी भूमिका साकारणार आहे. 

नोकियाच्या माहितीनुसार, Nokia Bell Labs 2022 च्या अखेरीपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर लो पावर, स्पेस हार्डेन्ड आणि एँड टू एँड LTE सोल्यूशन लावणार आहे. NASA ने नोकियासह अनेक कंपन्यांना एकूण ३७० मिलियन डॉलर म्हणजे २७.१३ अरब रुपये देणार आहे. ज्यामुळे चंद्रावर 4G LTE नेटवर्क लावण्यात येणार आहे.