या अॅपमुळे अफवा रोखता येणार, तुम्ही अशी करु शकता मदत

व्हॉट्सअॅपवरील अफवा थांबविण्यासाठी आणि खोट्या बातम्या ओळखण्यासाठी एका संस्थेच्या विशषतज्ञांची टीम अॅप्लिकेशन बनवतेयं.

Updated: Jul 30, 2018, 08:03 AM IST
या अॅपमुळे अफवा रोखता येणार, तुम्ही अशी करु शकता मदत title=

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवरील अफवा थांबविण्यासाठी आणि खोट्या बातम्या ओळखण्यासाठी एका संस्थेच्या विशषतज्ञांची टीम अॅप्लिकेशन बनवतेयं. कोणता मेसेज हा फेक आहे किंवा नाही हे अॅपमुळे कळणार आहे. इंद्रप्रस्थ इंस्टीट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी- दिल्ली (आयआयटी-डी) चे सहायक प्रोफेसर पोन्नुरांगम कुमारगुरू हे या अॅप बनवणाऱ्या टीमचे नेतृत्व करताहेत.

मॉब लिचिंगवर उपाय 

व्हॉट्सअॅपवरील अफवांमुळे जमावाकडुन हत्या होण्याच्या अनेक घटना समोर आल्या. यामध्ये महाराष्ट्रातील रेनपाडा गावात मुलं चोर असल्याच्या संशयातू पाच जणांची मारहाण करुन हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. नुकतेच कर्नाटकच्या बीदरमध्ये गर्दीने तीन जणांना मुलं चोर असल्याच्या संशयातून मारहाण करुन जखमी केलं.

या नंबरवर करा व्हॉट्सअॅप

सध्याच्या या वाढत्या मॉब लिचिंगला आळा घालण्यासाठी हे अॅप उपयोगी येणार आहे. यामध्ये व्हॉट्सअॅपवर पसरलेल्या अफवांमुळेच अशा घटना घडल्याचे तपासात निष्पन्न झालंय. मोठ्या प्रमाणात डेटा एकत्र होत असून तुमच्या मोबाईलमध्ये आलेली खोटी बातमी ९३५४३२५७०० नंबरवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आलंय. या बातमीची छाननी करुन त्याप्रमाणे पसरणाऱ्या बातम्यांवर लगाम घालता येईल अशा पद्धधतीचं मॉडेल बनवलं जाणार आहे.